शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Updated: November 17, 2014 22:51 IST

राजुरा तालुक्यातील अनेक गावांत इंडियन मेडीकल असोसिएशनचे अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या डॉक्टरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या डॉक्टरांच्या उपचारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे

राजुरा : राजुरा तालुक्यातील अनेक गावांत इंडियन मेडीकल असोसिएशनचे अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या डॉक्टरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या डॉक्टरांच्या उपचारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. हे बोगस डॉक्टर रुग्णांचा जीव धोक्यात आल्यानंतर आपल्या मर्जीप्रमाणे डॉक्टरांचे नाव सुचवून त्यांच्याकडे पाठवितात. त्यातून संबंधित रुग्णांची लूट केली जात आहे. तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा कोलमडल्यामुळे रुग्णांना नाईलाजाने बोगस डॉक्टराकडून उपचार करून घ्यावे लागत आहे. रुग्णांची कोणतीही तपासणी न करता रुग्णाला अगोदर इंजेक्शन लावले जाते. त्यानंतर गोळ्या दिल्या जातात. यामुळे अनेकदा प्रकृती सुधारण्याऐवजी ती खालावतच जाण्याचा प्रकारही अनेकदा घडतो. या माध्यमातून ग्रामीण अशिक्षित जनतेला लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू आहे.ग्रामीण भागात शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच उपकेंद्रात परिचारिका उपचार करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून गावे लांब अंतरावर असल्यामुळे जाणे-येणे अवघड असते. याच संधीचा फायदा घेत बोगस डॉक्टरांचा व्यवसाय बिनधास्त सुरू आहे. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. कारवाईच होत नसल्याने त्यांना पोलीस विभाग व आरोग्य विभागाची भीती नाही. फक्त घरोघरी जावून उपचार करून खिसे गरम करणे हा एकमेव व्यवसाय हे डॉक्टर करीत आहेत. बोगस डॉक्टरांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी होतो. रुग्ण कमी येतात. परिणामी वैद्यकीय अधिकाऱ्याला आराम मिळतो. त्यामुळे बोगस डॉक्टरांची तक्रार केली जात नाही. बहुतेक गावात शासनाचे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. त्यांना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांची नावे माहित आहे. मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.सध्या मलेरिया, टायफाईड, डेंग्यूची साथ सर्वत्र सुरू आहे. त्यावर तज्ज्ञ डॉक्टराकडून उपचार करणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण गेल्यास आरोग्य कर्मचाऱ्यावर ताण येतो. भरती केल्यास रुग्णाची पुर्णवेळ देखरेख करावी लागते. त्यामुळे कर्मचारी संबंधित रुग्णाला आरोग्य केंद्रातून कसे पळविता येईल, यासाठी प्रयत्न करतात. प्रसंगी रुग्णाला आवश्यक उपचारही दिले जात नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. अपूर्ण उपचारामुळे रुग्ण पुन्हा आजारी पडतो. मग त्याचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारावरील विश्वास उडतो. यातून बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत आहे.बोगस डॉक्टरांना मेडीकल स्टोअर्समधून औषधी दिली जात नाही. परंतु आडमार्गाने ही औषधी उपलब्ध करून दिली जाते. बोगस डॉक्टरांंना सलाईन लावण्याचा अधिकार नसताना सलाईन लावली जाते. त्याचे १००-१२० रुपये घेतले जातात. गोरगरीबांना याचा आर्थिक फटका बसतो. पुर्ण रक्कम दिल्याशिवाय रुग्णास जावू दिले जात नाही. त्यामुळे उसणवारी करून डॉक्टरांचे बिल द्यावे लागते. त्यानंतर रुग्णाची सुटका केली जाते. (तालुका प्रतिनिधी)