शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरवर पोलिसांत गुन्हा दाखल

By admin | Updated: July 27, 2016 01:09 IST

राजुरा तालुक्यातील लक्कडकोट आणि कोष्टाळा येथील दोन महिलांचा बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला होता.

राजुरा : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट आणि कोष्टाळा येथील दोन महिलांचा बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्या बोगस डॉक्टरवर मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. भुपाल असे बोगस डॉक्टरचे नाव असून तो सध्या फरार आहे. राजुरा तालुक्यातील कोष्टाळा, लक्कडकोट, गोट्टा यासह कोरपना, जिवती तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर असून विना परवानगीने ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. डॉ. भुपाल नामक बोगस डॉक्टरच्य इंजेक्शनमुळे लक्कडकोट आणि कोष्टाळा येथील दोन महिलांचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी गजेंद्र अहीरकर यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत बोगस डॉक्टरच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली असता, डॉ. भुपालवर ३०४ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्या क्लिनीकचा पोलिसांसमक्ष पंचनामा केला असता, दोन लाखांचा औषधसाठा सापडला. त्यातील काही औषधे एक्सपायरी झालेली होती. (शहर प्रतिनिधी)