शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांमुळे कपाशी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:10 IST

शक्ती प्लस ही बियाणे वापरल्याने कपाशीचे पीक करपले, अशी तक्रार बिबी येथील शेतकºयाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : शेतकºयांची कृषी विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : शक्ती प्लस ही बियाणे वापरल्याने कपाशीचे पीक करपले, अशी तक्रार बिबी येथील शेतकºयाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली आहे.कोरपना तालुक्यातील बिबी येथील शेतकरी सुरेंद्र बापुराव गिरडकर यांच्या सर्वे नं. मधील ३ एकर कपाशीची झाडे जागेवरच करपून वाळत आहे. यामुळे शेतकºयाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकºयाचे म्हणणे आहे. तक्रार सुरेंद्र गिरडकर म्हणाले, खरिपात हंगामातील नियोजनाप्रमाणे शेतात बियाणांची पेरणी करून काळजी घेण्यात आली. मशागतीसाठी बराच खर्च आला. मात्र, ऐन कापसाचे पीक हाती येण्याच्या कालखंडातच झाडे करपू लागली. याचा परिणाम फळधारणेवर होत असून पाने करपून वाळत आहेत. बियाण्यांमुळे हा प्रकार घडला. उत्पादन कमी होणार असून, याला कारण बियाणे आहे. नजीकच्याही शेतशिवारात काही शेतकºयांच्या कपाशीची झाडे अशीच करपत असल्याचा प्रकार दिसत आहे. त्यामुळे बियाणे कंपनीवर कारवाई करून गुन्हे दाखल करावी, अशी मागणी सुरेंद्र गिरडकर यांनी केली आहे.कृषी विभागाकडून कानाडोळाशेतकºयांनी यासंदर्भात पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार केली. या घटनेला दोन आठवडे झाले. मात्र संबंधित अधिकाºयांनी शेतीची पाहणी केली नाही. वारंवार विचारणा करूनही जाणीवपूर्वक कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला. यासंदर्भात यवतमाळ येथील श्रीराम अ‍ॅग्रो कंपनीच्या व्यवस्थापंकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, हा परिणाम बियाण्यांमुळे नसून चुकीच्या व्यवस्थापनामुळे झाला आहे. याला कंपनी जबाबदार नाही.