कोरपना : लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर, पोलीस स्टेशन गडचांदूर, डॉक्टर असोसिएशन गडचांदूर, दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, भीमसेना बहूद्देशीय सुधार संस्था गडचांदूर, लोकमत सखी मंच, अर्थ फाउंडेशन गडचांदूर, वी कॅन फाउंडेशन गडचांदूर, संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, कोरपना तालुका, बेरोजगार प्रॉडक्शन गडचांदूर, अभिनव सामाजिक विकास संस्था, गडचांदूर यांच्या संयुक्त पुढाकाराने गडचांदुर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात आज (दि.७) ला लोकमतचे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता अनिल चिताडे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सविता टेकाम, उपनगराध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्र. सचिव धनंजय गोरे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खेकडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी आदी उपस्थित राहतील.
'लोकमत रक्ताचं नातं' या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन लोकमतचे तालुका प्रतिनिधी आशिष देरकर - ९९२२९३०१३३, सखी मंच संयोजिका कल्पना निमजे - ९८६०१०३७७७, डॉ. प्रवीण लोनगाडगे, डॉ. कुलभूषण मोरे, उमेश राजुरकर, सतीश जमदाडे, विक्रम येरणे, राहुल उमरे, मनोज भोजेकर, प्रा. प्रशांत पवार, प्रा. प्रदीप परसुटकर, श्यामकांत पिंपळकर, सतीश बेतावर, नितेश शेंडे, शैलेश लोखंडे, मयूर एकरे, विनोद तराळे, विक्की मुन, संतोष महाडोळे, प्रीतेश मत्ते, अतुल गोरे, आशिष वांढरे, विजय डायले, गौरव मेश्राम, एजाज इस्माईल शेख, इमरान पाशा शेख आदींनी केले आहे.