शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपेढी आक्सिजनवर, दोन दिवसाच रक्त साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते.  विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देदात्यांनो रक्त द्या : रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताची अधिक गरज आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते.  विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढावा यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, ६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० ते ४ पर्यंत करू शकता रक्तदानयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील रक्तपेढीमध्ये १० ते ४ वाजेपर्यंत रक्तदान करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही येथे येऊन रक्तदान करता येते. रक्तदानामुळे दुसऱ्या एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे स्वमर्जीने येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्येही सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत येऊन रक्तदान करता येते. मनात गैरसमज न ठेवता सर्वांनी रक्तदान करावे-डाॅ. अनंत हजारे, रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर

लस घेण्यापूर्वी रक्तदान कराकोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबिवली जात आहे. त्यामुळे रक्तदानावरही याचा परिणाम होत आहे. नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून  रक्तदान करणे हाच पर्याय आहे.

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी