शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

गोवरीवासीयांचा तिसऱ्यांदा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST

धुळीमुळे नागरिकांचा गुदमरतोय जीव : वेकोलीने आश्वासन पाळले नाही गोवरी : बल्लारपूर वेकोलीअंतर्गत गोवरी डीप कोळसा खदानीतून ...

धुळीमुळे नागरिकांचा गुदमरतोय जीव : वेकोलीने आश्वासन पाळले नाही

गोवरी : बल्लारपूर वेकोलीअंतर्गत गोवरी डीप कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी २ सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले होते. तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास सुरू झाल्याने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्यांदा रस्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. तब्बल तीन तास कोळसा वाहतूक रोखली होती.

गावकऱ्यांना दिलेले आश्वासन वेकोली अधिकाऱ्याने पाळले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भास्कर जूनघरी, विकास पिंपळकर यांच्या नेतृत्त्वातील गावकऱ्यांनी चक्का जाम केले. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चक्का जाम आंदोलनात वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य रस्त्यावर पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले. चौकात सुरक्षारक्षक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांपासून टँकरने पाणी मारणे बंद आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा गावकऱ्यांनी कोळसा वाहतूक रोखून धरली. त्यानंतर समस्या सोडविण्याचे आश्वासन वेकोली अधिकाऱ्यांनी दिले. वेकोलीने या मार्गावर चालणाऱ्या वाहतुकीबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही तर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून कोळसा वाहतूक होऊ दिली जाणार नाही, असा इशारा भास्कर जूनघरी यांनी वेकोली अधिकाऱ्यांना दिलेला आहे.

बॉक्स

या समस्यांनी नागरिक वैतागले

रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. सिक्युरिटी गार्डचा पत्ता नाही. धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र, वेकोलीचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. रस्त्याच्या कडेला झुडपे जंगले वाढलेली आहेत. त्यामुळे वळणावरून येताना समोरचे नागरिक दिसत नाहीत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गोवरी, पोवनी, साखरी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. यामुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजलेले आहेत. रस्त्यावर प्रचंड महाकाय खड्डे पडलेले आहेत. या मार्गावरील नाल्यावर बांधण्यात आलेले पूलही धोकादायक स्थितीत आहेत. याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

160921\img_20210916_142900.jpg

गोवरी वासियांचे तिसऱ्यांदा रस्तारोको आंदोलन