शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकरण मिटविण्याच्या नादातच पेटला गोंडपिपरीतील ‘झेंडा वाद’

By admin | Updated: October 3, 2015 01:01 IST

येथील बहुचर्चित झेंडा वाद मिटविण्याच्या प्रयत्नातच अधिक पेटल्याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. या एकूणच प्रकरणात आता अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.

दोन वर्षातील दुसरी घटना : अधिकारीच ठरले ‘टार्गेट’वेदांत मेहरकुळे गोंडपिपरीयेथील बहुचर्चित झेंडा वाद मिटविण्याच्या प्रयत्नातच अधिक पेटल्याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. या एकूणच प्रकरणात आता अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.शहरातील बाजार मार्गावरील स्थित हनुमान मंदिरातील शिवलिंग हनुमान मूर्तीची तोडफोड करून अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. ही घटना सोमवारच्या सकाळी नागरिकांना लक्षात येताच संपूर्ण गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिक एकत्र आले. याच दरम्यान, गावात बंदचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी गावातील प्रमुख राज्यमार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. शहरात सर्वत्र तणावाची परिस्थिती असताना पोलिसांकडून प्रकरणाचा निपटारा करताना झालेली चूक ही जनतेच्या रोषाचे कारण होऊन ‘झेंडा’ या नव्या वादाला प्रारंभ झाला आणि गत काही वर्षापूर्वी इतिहासजमा असलेल्या मूर्ती विटंबना प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. कुठल्याही धर्मासंबधातील विटंबना हा निंदनिय प्रकार आहे. मात्र समाजातच वावरणाऱ्या काही समाजकंटकांकडून असा अनुचित प्रकार घडणे ही विकृतीच म्हणावी लागेल. तत्पूर्वी तालुक्यातील अशाच एका घटनेचा आढावा घेतल्यास गत काही वर्षांपूर्वी तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या तामसा (खु) गावाजवळील वैनगंगा तिरावर शिवमंदीर आहे. तेथील शिवलिंगाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. याची वार्ता तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पसरताच, त्या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी जमून वैनगंगा नदी तिरावरही आंदोलन पेटले. यावेळी गोंडपिपरीचे तत्कालिन तहसिलदार मदन खाडीलकर हे प्रकरणाचा निपटारा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोहचले. दुभंगलेल्या मूर्तीची डागडुजी करून पुन्हा पूजा करावी, असा सल्ला देऊन ते तेथून निघाले आणि वादाला तोंड फुटले. नागरिकांच्या भावना अनावर होवून आंदोलन भडकले. या घटनेचे पडसाद म्हणून खाडीलकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.सोमवारी गोंडपिपरीत घडलेल्या निंदनिय घटनेत पोलिसांनी जर मागील घटनेचा आढावा घेतला असता तर निश्चितच ‘झेंडा वाद’ पेटला नसता. सोमवारी शहरातील नागरिक मूर्तीची विटंबना झाल्यानंतर निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर आले. नागरिकांचे आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू असताना पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या वाहनातून आलेल्या शिपायाने पुढे येऊन आंदोलकांच्या हातातील झेंडा हिसकावून तो मोडण्याचा प्रयत्न केला. तेथूनच नव्या वादाला तोंड फुटले. यावेळी पोलिसांनी जर संयम बाळगून नागरिकांची समजूत घातली असती तर वाद उफाळला नसता. मूर्ती विटंबनेसारखे निंदनिय प्रकरण घडवून आणणाऱ्यांना धडा शिकविणे ही काळाची गरज आहे.आजघडीला झेंडा वादामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात दरी निर्माण झाली आहे. झेंडा वादाचे मुळ ठरणाऱ्या पोलीस शिपायासोबतच ठाणेदार बोत्रे यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच प्रकरणाचे दुसरे दिवशी येथीलच एका हॉटेल व्यवसायिकाला आंदोलनातील प्रमुखांपैकी एक असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्याला दमदाटी करण्याचा प्रतापही पोलिसांकडून करण्यात आल्याचे त्या युवकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या सर्व प्रकरणात ठाणेदार बोत्रेसह शिपाई मनोज धकाते याची तडकाफडकी बदली झाल्याची शहरात चर्चा आहे.या मूर्ती विटंबनेच्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीचा शोध घ्यावा व त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.