शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उमलत्या कळींमध्ये पसरतेय काळे विष !

By admin | Updated: December 1, 2014 22:50 IST

दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे.

सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे. धुळीच्या प्रदूषणामुळे बालकांमध्ये न्युमोनिया, सर्दी, खोकला व त्वचेचा आजार वाढत आहे. शुद्ध हवेत श्वासोश्वास घेण्याऐवजी चिमूकल्याच्या नाकात कोळशाची धूळ शिरत आहे. त्यामुळे भविष्यात विविध आजारांची शक्यता बळावली आहे. या उमलत्या कळ्यांची धुळीपासून वेळीच मुक्तता न केल्यास वेळेच्या आधी ‘त्या’ कळ्या कोमजल्या शिवाय राहणार नाही आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय कोंढावासीयांजवळ काहीच उरणार नाही. हे वास्तव आहे कोंढागावचे. ज्या गावात धुळीमुळे बालकांना जगणे कठीण झाले आहे. धुळीमुळे गावातील मत्ते यांच्या दोन महिने वय असलेल्या नातीच्या नाकात धुळीचे खडे जमा झाले होते. तीन वर्षाच्या तन्मय विरुटकर याला त्वचेचा आजार आहे. दोन वर्षाच्या आर्या गोंडेच्या शरीरावर खरुज झाली आहे. १० वर्षाच्या पुजा मंगाम हिला डोळ्याची समस्या निर्माण झाली आहे. १९ वर्षाच्या स्वप्नील ठावरीला धुळीमुळे काळजाशी संगलग्नीत आजार झाला आहे. सुहाना राजुरकर (अडीच वर्ष), आस्टु वरारकर (४), राणी डाखरे (४) धनश्री साखरकर (६), लिना माणूसमारे (९), विशाल मंगाम, रोहीम मंगाम, संजू देवतळे, राधिका माणूसमारे, कुणाल काळे, गणेश खेरे यांना धुळीमुळे सर्दी, पोटदुखी, गळ्यात खसखस, सतत खोकला या आजारांना सामोरे जावे लागले आहे.कर्नाटका एम्टा कंपनीकडून केल्या जाणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध कोंढावासीयांच्या मनात तिव्र भावना आहेत. कोंढा फाटा ते चालबर्डीपर्यंतच्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरुन होत असलेल्या कोळसा वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम कोंढा येथील बालकांवर होत आहे.