शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या फिती लावून पत्रकारांनी मोर्चात सहभागी व्हावे

By admin | Updated: August 24, 2015 01:13 IST

हल्ली पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. आणि आतातर एकात्मक वृत्त बघून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे.

चंद्रपूर : हल्ली पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. आणि आतातर एकात्मक वृत्त बघून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे. ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होय. असे असताना मात्र शासनाकडून पत्रकारांना कोणतेही संरक्षण दिले जात नाही. हे संरक्षण मिळणे आता काळाची गरज असून या संदर्भातीलही मागणी रेटून धरण्यासाठी मंगळवारी मुक मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पत्रकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत देण्यात आली.या बैठकीत बोलताना पत्रकार संजय रामगिरवार म्हणाले, दारूबंदीनंतर श्रमिक एल्गार संघटनेची जणू भूमिका बदलली आहे. कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याचे आता टाळले जाते. गडकरी यांच्या बातमीवर श्रमिक एल्गारने आपली भूमिका पोलिसात तक्रार देऊन स्पष्ट केली आहे. त्यामुळे पत्रकार संघटनांनीही आपली भूमिका घ्यायला पाहिजे, तर या विषयी बोलतांना चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास म्हणाले, या घटनेचा तिव्र निषेध नोंदविणे काळाची गरज असून हा निषेध संयुक्तरित्या नोंदविल्या गेला पाहिजे, असे ते म्हणाले. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात असेल तर अशा संघटनांच्या बातम्या प्रकाशित करू नका व अशा संघटनांचे पदाधिकारी एखाद्या कार्यक्रमात असतील तर त्याही बातम्या घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.सरतेशेवटी या विषयावर गांभीर्याने विस्तृत चर्चा करण्यात येऊन येत्या मंगळवारी येथील कौस्तुरबा चौकातून (गिरनार) पत्रकारांचा मूक मोर्चा श्रमिक एल्गार संघटनेचा निषेध नोंदविण्यासाठी काढण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने काळी फित लावून सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल मांडवकर, मुरलीमनोहर व्यास, किशोर पोतनवार, श्रीधरराव बल्की यांनी केले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता गिरनार चौकातून निघणार असेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सभेला उपस्थित सर्व पत्रकार संघातर्फे निषेध प्रस्ताव पारित करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)बल्लारपुरात निषेध सभासावली येथील पत्रकार उदय गडकरी यांच्यावर सहा पोलीस ठाण्यात श्रमिक एल्गार संघटनेकडून तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेच्या निषेधात रविवारी वसंत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. याप्रकरणी दाद मागण्यासाठी उद्या सोमवारी येथील तहसीलदार यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अजय दुबे, पदमाकर पांडे, मंगल जीवने, योगेश खेडेकर, अनकेश्वर मेश्राम, नरेश मुंदडा, समीर केने, श्रीनिवास, विकास राजूरकर आदी उपस्थित होते.