शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकीट केंद्रांमध्ये तिकीटांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:08 IST

मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरएसएफ पथकाने सोमवारी रात्री रेल्वे तिकीटचा अवैध व्यवसाय करणाऱ्या घुग्घुस येथील दोन केंद्रावर एकाच वेळी धाडी टाकल्या. या केंद्रातून रेल्वे ई तिकीटांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना रेल्वे अधिनियम १४३ कलमान्वये अटक केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेल्वे तिकीटांचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देआरसीएफ पथकाच्या धाडी : लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरएसएफ पथकाने सोमवारी रात्री रेल्वे तिकीटचा अवैध व्यवसाय करणाऱ्या घुग्घुस येथील दोन केंद्रावर एकाच वेळी धाडी टाकल्या. या केंद्रातून रेल्वे ई तिकीटांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना रेल्वे अधिनियम १४३ कलमान्वये अटक केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेल्वे तिकीटांचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे.घुग्घुसचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्यासह रेल्वे एसएफच्या नागपूर पथकाने सोमवारी रात्री येथील इस्माईल बुक डेपो आणि अशोक मदान किराणा येथे एकाच वेळी धाडी टाकल्या. तपासणी केली असता तिकीट दरापेक्षा अधिक पैसे वसूल केले जात असल्याचे दिसून आले.या धाडसत्रात आरोपी मोहम्मद हनिफ शेख याच्या दुकानातून अवैधरित्या बनविलेले ४९ ई-तिकीट, संगणकात ११ बनावट आयडी, एक संगणक, एक पेन ड्राईव्ह, एक मोबाईल व पाच हजार रुपये नगदी असा एकूण एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अशोक थाराराम मदान यांच्या दुकानातून ४८ ई-तिकीट, बनावट दोन आयडी, एक संगणक, एक डोंगल, एक प्रिंटर, एक मोबाईल, असा एक लाख ४० हजार २२४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोनही धाडीत एकूण दोन लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनखाली मध्य रेल्वे सुरक्षा बल मोतीबागचे निरीक्षक गणेश गरकल, चंद्रपूर रेल्वे सुरक्षा बलाचे निरिक्षक शैलेंद्र सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.काळाबाजार फोफावलामागील अनेक वर्षांपासून रेल्वे तिकीटांचा काळाबाजार फोफावला आहे. मात्र याबाबत प्रवासी ओरड करीत असले तरी याबाबत अधिकृत तक्रार केली जात नव्हती. चंद्रपुरातील अनेक ठिकाणी तिकीट आरक्षण व विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याचीही शक्यता आहे. मात्र याबाबत आता रेल्वे सुरक्षा दलानेच लक्ष घालणे सुरू केल्याने अशा अवैध व्यावसायिकांचे धाब दणाणले आहे.चंद्रपुरातही धाडीचंद्रपूर येथील प्रशांत आकोटकर, श्रीराम गिफ्ट सेंटर अँड जनरल स्टोअर्स श्रीराम वॉर्ड चंद्रपूर, रंजित गजानन सवाईतुल, श्री ई- सुविधा सेंटर, सिध्दार्थ नगर ताडोबा रोड दुर्गापूर यांच्यावरही अवैधरित्या रेल्वे तिकीट विकण्याच्या प्रकरणात रेल्वे सुरक्षा पथकाने कारवाई केली.