शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 06:08 IST

अंनिसकडून कारवाईची मागणी

चंद्रपूर : लग्न करून घरी आणलेल्या नववधूच्या अंगावरील हळद उतरत नाही तोच दुसऱ्याच दिवसापासून तिच्याकडून गुप्तधनाच्या प्राप्तीसाठी अघोरी कृत्य करायला लावल्याचा खळबळजनक प्रकार अखिल भारतीय अंनिसने उजेडात आणला आहे.

समितीने दिलेल्या तक्रारीनुसार, चिमूर तालुक्यातील बिडकर येथील माजी जि.प. सभापती गुणवंत कारेकार यांचा मुलगा समीर याचा १९ आॅगस्ट २०१८ रोजी सविता हिच्याशी विवाह झाला. त्याचदिवशी समीरची आई घसरून पडली असता तिने सवितावर अवदसा, अपशकुणी असल्याचा ठपका ठेवला. यानंतर दुसºयाच दिवसापासून गुप्तधनाच्या लालसेपोटी पती, सासू व सासऱ्यांनी मिळून सविताला अघोरी पूजा करायला भाग पाडले. दररोज पहाटे ३ वाजता दर्गा पाण्याने धुवून स्वच्छ करणे. नंतर दर्ग्यामधील कासवाला पाण्याने आंघोळ घालणे. समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा येतो, त्यावेळी तो शिवीगाळ व मारझोड करेल ते सहन करणे.

कासवाची गंध, कुंकू, हळद लावून पूजा करणे, पूजा केल्यानंतर कासवाला दर्ग्याजवळ बसून एक-दीड किलो मुरमुरे खाऊ घालणे. हे करत असताना तिला दररोज मारझोड केली जात होती. या प्रकरणी जादुटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.