शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांनी फडकविला काळा झेंडा

By admin | Updated: May 2, 2017 01:00 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विदर्भवाद्यांनी काळा झेंडा सोमवारी फडकविला.

महाराष्ट्र दिन : विदर्भावरील अन्यायाचा निषेधचंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विदर्भवाद्यांनी काळा झेंडा सोमवारी फडकविला. तसेच विदर्भाचा झेंडा लावून विदर्भावरील अन्यायाला वाचा फोडण्यात आली. यावेळी अनेक विदर्भवादी उपस्थित होते. १ मे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिवस म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथील हुतात्मा स्मारक येथे १०६ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्याचवेळी विदर्भवाद्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा निषेध नोंदविला. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील खनिज संपत्ती आणि नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला. विदर्भाचा अनुशेषही आतापर्यंत पुर्ण करण्यात आलेला नाही.विदर्भात खनिज संपत्ती असताना त्यावरील उद्योग मात्र पश्चिम महाराष्ट्र व मुंबई परिसरात स्थापन करण्यात आले. त्यामुळे विदर्भातील युवक बेरोजगार राहिले. या सर्व अन्यायाचा उल्लेख करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी काळा झेंडा फडकविला. यावेळी विदर्भ राज्य झालेच पाहिजे अशा घोषणा देवून विदर्भावरील अन्यायाचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी विदर्भाचे खंदे समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून अभिवादन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार व शहराध्यक्ष अनिल दिकोंडवार सहभागी झाले. यावेळी कपिल इद्दे, मधुकर चिंचोलकर, मारोती येरणे, रामेश्वर महाजन, मन्सूरभाई, अनिल बाळ सराफ, वैभव रामेडवार, प्रवीण मोरे, हिराचंद बोरकुटे, रमेश मानकर, चेतन रावते, मितीन भागवत, नथ्थूजी महाजन, चुनारकर, गोपी मित्रा वसंत चांदेकर, मुक्तानंद भोंगळे, मारोतराव बोथले, अ‍ॅड. चेताली बोरकुटे, प्रा. माधव गुरनुले, दिवाकर माणुसमारे, अजय आंबेकर, महादेव बोरेकर, बाबा कडूकर, भय्या रामटेके, रामचंद्र पेंढारकर, ए. रामकुमार, पुंडलक गोठे, पठाण आदी विदर्भवादी संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित होते. (प्रतिनिधी)