शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीमध्ये सत्तारुढ होण्यासाठी भाजपचा मार्ग मोकळा ?

By admin | Updated: January 14, 2016 01:47 IST

येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच प्रथमच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आला.

पाच अपक्षांचे समर्थन : भाजपा जिल्हा सचिवांकडून मिळाली माहितीगोंडपिंंपरी : येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच प्रथमच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आला. यात भाजपला सर्वाधिक सहा, काँग्रेसला तीन, शिवसेना एक व अपक्ष सात अशा जागा वाट्याला आल्याने भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चितच झाले होते. याच दरम्यान काल मंगळवारी पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपला पाच अपक्ष उमेदवारांनी विनाशर्त पाठिंबा दिल्याने लवकर नगरपंचायतीमध्ये भाजप सत्तारुढ होणार, अशी माहिती जिल्हा सचिव बबन निकोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गोंडपिंपरी नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पार पडली. मात्र या निवडणुकीत मतदारांचा कौल हा अपक्ष उमेदवारांकडे अधिक असल्याने निकालात अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले तर भाजपाला सर्वाधिक सहा जागा मिळाल्या. अतिशय चढाओढ व चुरशीची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस- भाजपा या दोन्ही पक्षातील काही उमेदवारांना अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अशातच भाजपाची भक्कम बाजू लक्षात घेत अपक्ष उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी भाजपाला समर्थन देण्याचे ठरवून सत्ता स्थापनेकरिता विनाशर्त मदत कार्य चालविल्याने येत्या काही दिवसातच भाजप सत्तारुढ होण्याची शक्यता वाढली आहे.तत्पूर्वी काही नेते मंडळींनी भाजपला सत्तेपासून दूर लोटण्याकरिता अपक्षांची सांगड घालून सत्ता स्थापनेसाठी अनेक बैठका घेतल्या. मात्र तडजोड न जमल्याने अखेर तोडगा काढण्यात असमर्थ ठरलेल्यांनी माघार घेत भाजपचा मार्ग मोकळा करुन दिला आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगततदार ठरली होती. आताही ही रंगत कायम आहे. राजकीय उलथापालथीचे अनेक समीकरणे मतदारांना या दरम्यान पहावयास मिळाले आहे. तर जिल्हा पातळीवरील नेत्यांचे मार्गदर्शन काही पक्षांना संजीवनी देणारेही ठरले, असे म्हणण्यास काही वावगे नाही. गेल्या दोन दिवसांपासून जादुई आकडा गाठण्यासाठी राजकीय तडजोडी सुरू झाल्या आहेत. तडजोडीच्या या राजकारणाबाबत मंगळवारी जिल्हा सचिव बबन निकोडे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता पाच अपक्षांच्या समर्थनांमुळे भाजपा गोटाचे संख्याबळ ११ वर पोहचले असल्याची कबुली त्यांनी दिली. तर नगराध्यक्ष कोण, असे विचारले असता त्यांनी नाव घेण्याचे टाळून लवकरच आपणास व नागरिकांना कळणार असेही ते म्हणाले. राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती व कोरपना या नगरपंचायतींवर झेंडा फडकाविण्यात भाजपाला यश आले नाही, हे मात्र विशेष. (तालुका प्रतिनिधी)