शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुक्त म्हणणे भाजपाचा बालीशपणा

By admin | Updated: July 17, 2016 00:38 IST

देशात व राज्यात सत्ता कााबीज करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी भारतभर जाहीर सभेत जनतेला ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवित...

पत्रकार परिषद : माधव बिरजे यांची टीकाचिमूर : देशात व राज्यात सत्ता कााबीज करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी भारतभर जाहीर सभेत जनतेला ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवित प्रत्येकांच्या खात्यात १०० दिवसांत १५ लाख रूपये टाकू, अशा प्रकारची अनेक खोटी आश्वासने दिली. जनतेने या आश्वासनावर विश्वास ठेवून भाजपाला सत्ता दिली. मात्र काही दिवसांतच भाजपाने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवून जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे येत्या काळात जनता भाजपाला सत्तेतून मुक्त करेल, असा आरोप करीत देशाला व चिमूर तालुक्याला काँग्रेसमुक्त करू असे म्हणणे भाजपाचा बालीशपणा असल्याची टीका तालुका काँग्रेस अध्यक्ष माधव बिरजे यांनी पत्रकार परिषदेत केली.भाजपाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कामाबाबतचा लेखाजोखा सांगताना भाजपा लाटेच्या परिवर्तनातून सत्तेवर आली. चिमूर विधानसभा क्षेत्रातही भाजपाचे कीर्तीकुमार भांगडिया निवडून आले. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात चिमूर क्षेत्रात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे अनुदान, उन्हाळ्यातील अनेक गावातील भीषण पाणी टंचाई, नगर परिषद सीमेतील घरकूल, शौचालय, विहीर या लाभार्थ्यांचे काम होऊनही पैसे मिळत नाही. त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.कोट्यवधी रुपयांची कामे झाली म्हणून घोषणा करायच्या मात्र प्रत्यक्षात कुठेही फलकाशिवाय काही दिसत नाही. फक्त मीडियातूनच प्रसिद्धी करण्याचा सपाटा स्थानिक आमदार व भाजपाने चालविला आहे. स्थानिक नगरपरिषदेपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सुद्धा भाजपाचीच सत्ता आहे. पंचायत समितीची काय परिस्थिती आहे हे जनतेपासून लपून राहिले नाही. तेव्हा आगामी काळात जनताच त्यांना पूर्ण मुक्त करेल, असा आशावाद व्यक्त करीत चिमूर तालुका काँग्रेस मुक्त करू असे म्हणणे हा भाजपाचा बालीशपणाच असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले.यावेळी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा गटनेता डॉ. सतीश वारजूरकर, भीमराव ठावरी, नगरपरिषद सदस्य विनोद ढाकूनकर, अ. कदीर शेख, मनीष नंदेश्वर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)