शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

काँग्रेसच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस

By admin | Updated: February 14, 2017 00:33 IST

जि.प. - पं.स. निवडणुकीसाठी धाबा-तोहोगाव क्षेत्रात बाहेरील विरूद्ध स्थानिक उमेदवार, या मुद्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये रविवारी वाद झाला.

तिघांना अटक : बाहेरील उमेदवार मुद्यावरून घडला प्रकारगोंडपिपरी : जि.प. - पं.स. निवडणुकीसाठी धाबा-तोहोगाव क्षेत्रात बाहेरील विरूद्ध स्थानिक उमेदवार, या मुद्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये रविवारी वाद झाला. हिवरा येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.धाबा-तोहोगाव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसविरूद्ध भाजप अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तीव्र झाल्या आहेत. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी हिवरा येथे रविवारी सायंकाळी प्रचारसभा घेण्यात आली. सभेला अशोक रेचनकर, नामदेव सांगडे, हिवराचे उपसरपंच प्रकाश हिवरकर, सचिन फुलझेले आदी उपस्थित होते.यावेळी तेथे भाजपचे सुधाकर गिरमा, जगदीश पुलगमकर व किसन ठाकूर हे मद्यधुंद अवस्थेत पोहोचले. त्यांनी वाद घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. ‘आम्हाला पार्सलच पाहिजे’, अशा घोषणा ते देत होते. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धाबाच्या ठाणेदार सरकटे यांना घटनेची माहिती दिली. पोलीस ताफ्यासह सरकटे तत्काळ घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या तिन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. घटनेचे महसूल विभागाने चित्रिकरण केले आहे. (शहर प्रतिनिधी)काँग्रेसकडून घटनेचा निषेधधाबा-तोहोगाव मतदार संघात बाहेरील उमेदवार नको असे वातावरण तापले आहे. काँग्रेसतर्फे भाजपविरोधात प्रचार चालविला जात असल्याने हिवरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी सभा उधळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निषेधार्थ असल्याची टीका अशोक रेचनकरसह इतर कार्यकर्त्यांनी केली.धुडगूस घालणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत. त्यांचा भाजपशी संबंध नाही. दारू पिऊन असे कृत्य केल्याने ते तळीराम आहेत. भाजपचे कार्यकर्ते असे कृत्य करीत नाहीत.- बबन निकोडे, तालुका अध्यक्ष, भाजपा, गोंडपिपरी.