लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील प्रियदर्शिनी सभागृहाचा लोकार्पण सोहळा गुरुवारला होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप विनित असा उल्लेख असल्याने चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवारी अशा आशयाचे शहरभर लागलेले फलक युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हटविले.भाजपने जिल्हाभर भाजप विनित असलेल्या पत्रिका वाटल्या. बुधवारी चंद्रपूरात असेच फलक लावण्यात आले. सदर फलक तासाभरात आयुक्तांनी हटवावे, अन्यथा युवा सेना ते हटवेल, असा इशारा दिला. दीड तासानंतरही ते फलक कायम असल्याने युवासेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ते हटवून भाजपाची तानाशाही चालणार नाही, असे म्हणत निदर्शने केली. यावेळी जिल्हासेनेचे युवाप्रमुख संदीप गिऱ्हे, सोयल शेख, राहुल विरुटकर, मनीष जेठाणी, हिमायु अली, हर्षद कानमपल्लीवार, इलियास शेख, सुरज भोंगे, सुचित पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.बांधकामाची चौकशी करा : काँग्रेसप्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या नुतनीकरणाचे काम काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झाले आहे. यासाठी अडीच कोटींचा खर्च अपेक्षीत होता. परंतु, तो खर्च वाढत जावून साडेबारा कोटी रुपयांवर गेला, या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महामंत्री देवेंद्र बेले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
लोकार्पणाचे भाजप विनित असलेले बॅनर युवासेनेने हटविले
By admin | Updated: July 13, 2017 00:43 IST