शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या इमारतीत भाजपाचे कार्यालय ृ

By admin | Updated: June 22, 2014 23:59 IST

शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही परवानगी न घेता खांबाडा गावाच्या वनविभागाच्या इमारतीत पक्ष कार्यालय थाटण्याचा प्रयत्न केला.

दबंगगिरी : खांबाडा येथील कार्यकर्त्यांचा प्रतापवरोरा : शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही परवानगी न घेता खांबाडा गावाच्या वनविभागाच्या इमारतीत पक्ष कार्यालय थाटण्याचा प्रयत्न केला. कार्यालयासाठी लागणारे साहित्य इमारतीत ठेवत इमारतीवर ‘भाजपा पक्ष कार्यालय’ असा फलक रंगविला जात असतानाच, वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भाजपा कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या या दबंगगिरीची चर्चा खांबाडा परिसरात सुरू आहे.वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खांबाडा गावाच्या परिसरात नागपूर चंद्रपूर मार्गालगत वन विभागाची इमारत आहे. या इमारतीमध्ये वन विभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यासाठी त्या इमारतीनजीक वायरलेस टॉवरची उभारलेली आहे. वाहनाची तपासणी करण्याचे काम बंद झाल्याने सदर इमारत वापरतो वन विभागाने बंद केले. इमारतीचा वापर होत नसल्याने कित्येक वर्षांपासून इमारत बंद अवस्थेत आहे. जागा मोक्याची आहे व राज्य मार्गाला लागून असल्याने या इमारतीवर भाजपा कार्यकर्त्यांचा डोळा होता. इमारतीमध्ये भाजपाचे कार्यालय थाटण्याकरिता वन विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही व कार्यालयाकरिता लागणाऱ्या टेबल खुर्च्या आदी साहित्य इमारतीमध्ये नेऊन ठेवली. भाजपा कार्यकर्त्यांनी ईमारतीला रंगरंगोटी करुन घेतली. वन विभागाच्या इमारतीवर भाजपा कार्यालय खांबाडा असे फलक लावणे तेवढे बाकी होते. ही बाब वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, ते घटनास्थळावर त्वरित दाखल झाले व भाजपा कार्यकर्त्यांना वन विभागाची परवानगी पत्राची मागणी केली. परंतु भाजपा कार्यकर्त्यांनी परवानगी पत्र दिले नाही. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून साहित्य बाहेर काढण्यात सांगितले. परंतु साहित्य बाहेर काढले नाही. अखेर वन विभागाने इमारतीला कुलूप ठोकले. शासकीय इमारतीत विनापरवाना भाजपा कार्यालय उघडण्याच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यावर विजरण पडले. ‘अच्चे दिन’ येणार असे सांगत केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आले. आणि त्याच पक्षाचे कार्यकर्ते शासकीय इमारतीत अतिक्रमणाचा प्रयत्न करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)