शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विकासाभिमुख सरकार देण्याची क्षमता भाजपातच: सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: September 27, 2014 23:12 IST

विकासाभिमुख सरकार देण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने १०० दिवसांत केलेली लोकाभिमुख कामगिरी जनतेने बघितली आहे. त्यामुळे येत्या

चंद्रपूर : विकासाभिमुख सरकार देण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने १०० दिवसांत केलेली लोकाभिमुख कामगिरी जनतेने बघितली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व मित्र पक्षांच्या युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. गेली १५ वर्षे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे हे राज्य कोमात गेले होते, अशी टीकाही त्यांनी केली. लोकांची कामे होत नव्हती. अनेक समस्यांचा डोंगर राज्यात उभा झाला. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी वाढता नक्षलवाद, कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, महिलांवर दिवसाढवळ्या होणारे अत्याचार अशी समस्यांची मोठी मालिकाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केली. जनता आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला कंटाळली आहे. जनतेशी संवाद साधणारे, लोकांची कामे करणारे सरकार लोकांना हवे आहे, असेही ते म्हणाले.मतदार संघ पुनर्रचनेनंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी मी नवीन होतो. या मतदार संघातील नागरिकांनी प्रेम व विश्वास दाखवत मला प्रचंड बहुमताचा कौल दिला. गेल्या पाच वर्षांत विविध विकासाची कामे मी या विधानसभा मतदार संघात पूर्णत्वास आणली. विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. विरोधी पक्षाचा आमदार असतानाही मतदार संघासाठी विविध माध्यमातून निधी खेचून आणला. त्याद्वारे मतदार संघात कोट्यवधीची विकास कामे पूर्णत्वास आणल्याचेही त्यांनी सांगितले. बल्लारपूर येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती, मूल येथे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांचे स्मारक व सभागृह, बल्लारपूर शहरात चार कोटी रुपये किमतीच्या नाट्यगृहाला मंजुरी, मूल नगरपरिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील रस्ते बांधणीसाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर, मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा या ठिकाणी वाचनालयांची निर्मीती आदि कामे केली. (प्रतिनिधी)