सरपंचपदी ज्ञानेश्वर भोयर : उपसरपंचपदी चुमदेव जांभुळकर गांगलवाडी : नऊ सदस्यीय गांगलवाडी ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व राखत सरपंचपदी ज्ञानेश्वर भोयर तर उपसरपंचपदी चुमदेव जांभुळकर बहुमताने विराजमान झाले.गांगलवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी रविवारी निवडणूक पार पडली. सरपंच पदासाठी भाजपा गटाचे ज्ञानेश्वर भोयर व काँग्रेस गटाचे विनोद पाटील यांंनी तर उपसरपंच पदासाठी भाजपा गटाचे चुमदेव जांभुळकर व काँग्रेस गटाचे नामदेव मेश्राम नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात भाजपचे ज्ञानेश्वर भोयर यांना ५ तसेच चुमदेव जांभूळकर यांना ५ मते मिळाल्याने ज्ञानेश्वर भोयर याची सरपंच व चुमदेव जांभूळकर यांची उपसरपंचपदी वर्णी लागली.नवनिवाचित सरपंच व उपसरपंचाने आपल्या निवडीचे श्रेय ग्रामपंचायत सदस्या शोभा बोदेले, आशा म्हशाखेत्री, महिमा देशमुख तसेच संजय भोयर व गांगलवाडी वासीयांना दिले आहे. निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार संजय राठोड यांनी काम पाहिले. त्यांना ग्राम विकास अधिकारी एम.आर. भरडे,, तलाठी एम.आर. खरकाटे, पोलीस कर्मचारी जुमनाके, राणे व पोलीस पाटील नलेश भोयर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
गांगलवाडी ग्रामपंंचायतीवर भाजपाचे वर्चस्व
By admin | Updated: September 16, 2015 00:58 IST