शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप काँग्रेसला ब्लॅकमेल करीत आहेत : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:53 IST

पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे अर्धशिक्षित डॉक्टर असून काँग्रेसच्या प्रमुखांना आॅपरेशनची भीती दाखवून कॉंग्रेसला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यामुळे देशात काँग्रेससोबत कुठेही महाआघाडीचे गठबंधन होऊ शकले नाही. काँग्रेस, भाजप राजकीय मुद्यांवर एकमेकांना ब्लॅकमेल करीत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे अर्धशिक्षित डॉक्टर असून काँग्रेसच्या प्रमुखांना आॅपरेशनची भीती दाखवून कॉंग्रेसला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यामुळे देशात काँग्रेससोबत कुठेही महाआघाडीचे गठबंधन होऊ शकले नाही. काँग्रेस, भाजप राजकीय मुद्यांवर एकमेकांना ब्लॅकमेल करीत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. रमेश गजभे यांच्या प्रचारार्थ ब्रह्मपुरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. रमेश गजभे, गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे उमेदवार प्राचार्य डॉ. दशरथ नान्हे, माजी न्यायमूर्ती चंद्र्रकांत मेश्राम, डॉ. प्रेमलाल मेश्राम, विलास मैंद, डॉ. राहुल मेश्राम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, पुलवामा येथे घडलेल्या घटनेचा भाजप राजकारण करीत आहे. दहशतवाद्यांचे पूर्ण हवाई अड्डे का उद्ध्वस्त केले नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्या जाते. त्यानंतरच निवड होती. त्यामुळे स्वत:चे घर न सांभाळणाऱ्या भारतातील नरेंद्र मोदी यांना मतदारांनी कदापि निवडून देऊ नये. असे झाल्यास देश पुन्हा विकासात मागे पडेल, असा इशाराही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी डॉ. नान्हे, डॉ. रमेश गजभे, चंद्र्रकांत मेश्राम यांनीही विचार मांडले.प्रास्ताविक डॉ. प्रेमलाल मेश्राम, संचालन एस.के. रामटेके यांनी केले. आभार डॉ. राहुल मेश्राम यांनी मानले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूर