शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

By admin | Updated: January 1, 2017 01:14 IST

अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले.

जि.प. व पं.स. निवडणूक : मोर्चेबांधणीला वेग उदय गडकरी सावली अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले. सिंदेवाही नगर पंचायतीनेही भाजपच्याच बाजूने कौल दिला. या संपूर्ण निकालावरुन भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला असल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांमध्ये उदासिनता निर्माण झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे एकमेव आमदार विजय वडेट्टीवार आहेत. मात्र त्यांचा बालेकिल्ला असतानाही सिंदेवाही नगर पंचायतीवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व स्थापन करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अस्तित्व नसलेल्या आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना विचार करण्यास भाग पाडले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास भाजपाकडे दोन खासदार, पाच आमदार, दोन मंत्री एक केंद्रीय मंत्री आणि एक राज्याचे अर्थमंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री, शिवाय महाराष्ट्रात सत्ता एवढी सारी भाजपाकडे जमेची बाजू असताना त्यांची सर्वच स्तरात सत्ता प्रस्थापित होणे क्रमप्राप्तच आहे. हे नाकारण्याजोगे नाही. मात्र या सर्व रणधुमाळीत आ. वडेट्टीवारांची खरी परीक्षा आहे. नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निकालाने उत्साहित भाजपाचा व्यास चौफेर उधळण करीत असताना वडेट्टीवारांना आपल्या क्षेत्रात अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सावली तालुक्यात चार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आठ सदस्य क्षेत्र आहेत. विद्यमान स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जि.प. क्षेत्र तर भाजपा व काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक क्षेत्र आले आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादीनेच झेंडा रोवला होता. असे असतानाही राष्ट्रवादीचे या क्षेत्रातील प्रमुख नेते आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्यासमोरही या निवडणुकीचे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून या क्षेत्रात प्राबल्य नसले तरी संदीप गड्डमवारांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय आ. विजय वडेट्टीवारांचे हे क्षेत्र असल्याने त्यांच्या बाजुने जनमत मोठ्या प्रमाणात आहे. या तुलनेत मात्र भाजपाकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या व्यतिरिक्त कोणताही मोठा नेता नसतानासुद्धा केंद्र आणि राज्यातील सत्तेने भाजपा कार्यकर्ते उत्साहात आहेत. प्रधानमंत्री मोदींनी केलेल्या नोटबंदीमुळे निवडणुकांवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट फायदाच झाल्याचे भाजपाच्या उत्साहावरुन दिसून येत आहे. मात्र येणारी जि.प. व पं.स. निवडणूक ही सर्वच पक्षांकरिता रंगीत तालीम ठरणारी आहे. राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. चार पैकी काही जिल्हा परिषद क्षेत्रात नेमका कोणता उमेदवार द्यावा या संभ्रमात सर्वच पक्ष आहेत तर दुसरीकडे आंबेडकरी विचारधारेच्या संपूर्ण पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्धार केल्याने प्रमुख राजकीय पक्षांची धकधक वाढली आहे.