मूल : कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. यामुळे मूल येथील सामाजिक कार्यकर्ते मनीष रक्षमवार यांनी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे सात ऑक्सिजन सिलिंडर देऊन आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे प्रशासनाने त्यांचे आभार मानले. मनीष रक्षमवार यांचा २५ एप्रिल रोजी वाढदिवस असतो, प्रत्येक वाढदिवस ते आपल्या मित्रांना घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसोबत साजरा करीत असतात. मात्र मागील वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे घरीच साधेपणाने वाढदिवस साजरा करीत आहेत. परंतु या वर्षी कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन रक्षमवार यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मूल उपजिल्हा रुग्णालयाला सात ऑक्सिजन सिलिंडर भेट देऊन मानवतेचा संदेश दिला आहे.
सात ऑक्सिजन सिलिंडर भेट देऊन साजरा केला वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST