शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा ई-पंचायत घोटाळा

By admin | Updated: May 19, 2014 23:27 IST

राज्य शासनाकडून ई-पंचायत अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या संगणीकृत ग्राम महाराष्टÑच्या (संग्राम) कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार केला जात आहे.

 बनावट कंपनीमार्फत काम : डाटा एन्ट्री आॅपरेटर्सना मानधन नाही

चंद्रपूर: राज्य शासनाकडून ई-पंचायत अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या संगणीकृत ग्राम महाराष्टÑच्या (संग्राम) कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार केला जात आहे. राज्यभरातील घोटाळ्याचा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याचा खळबळजनक आरोप श्रमिक एल्गारने केला आहे. याबाबत कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात आले असल्याची माहितीही श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र शासनाच्या निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या अधिकारातील १३ व्या वित्त आयोगाच्या २० टक्के निधीही खर्च केला जात आहे. ग्राम विकास व जलसंधारण मंत्रालयाने हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी महाआॅनलाईनला दिली आहे. ग्रामपंचायत स्तरावर डाटा एन्ट्री आॅपरेटर नेमावे, त्यांना ८३२४ रुपये मानधन द्यावे व याबाबतचा करार ग्रामपंचायतीने करावा, असे ३० एप्रिल २०११ च्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नेमणूक करण्याबाबत ग्रामपंचायतीला आदेश न देता हे काम महाआॅनलाईनने व या कंपनीसोबत करार केलेल्या युनीटी टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर, युनीटी आय टी आणि चंद्रपूर आॅनलाईन लिमीटेड यांच्यामार्फत डाटा एन्ट्री आॅपरेटरशी करार करण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे त्यांना मानधन न देता केवळ ३८०० ते ४१०० रुपये मानधन दिले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ७५० तर राज्यात ३५ हजार डाटा एन्ट्री आॅपरेटर काम करीत आहेत. ज्यांच्या मानधनातील सुमारे १२ कोटी रुपयांचा घोटाळा प्रत्येक महिन्यात केला जात आहे. हा घोटाळ मागील चार वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. आॅपरेटरर्सना अर्धेही मानधन न देणार्‍या महाआॅनलाईनने कंपनीच्या सल्लागारांना मात्र दीड ते दोन लाख रुपये दरमहा देऊ केले आहे. शासन स्तरावर पारदर्शकता सांगितली जाते. परंतु महाआॅनलाईनच्या संकेतस्थळावर कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. शासनाची कंपनी असली तरी या कंपनीचा कुठलाही लेखाजोखा संकेतस्थळावर नाही. ज्यांना लाखो रुपये दरमहा दिले जाते, त्या सल्लागारांचा तपशील नाही. कार्याचा अहवालही नाही. कंपनीसोबत संलग्न कंपन्यांचाही तपशील व त्यांच्यासोबतचा करारनामा उपलब्ध नाही. एवढेच नव्हे तर चंद्रपूर आॅनलाईन कंपनीचा जो पत्ता देण्यात आला आहे, तोदेखील खरा नसून कंपनीचे कार्यालयही नाही, अशी माहिती गोस्वामी यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)