शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन क्रांती मोर्चाची धडक

By admin | Updated: January 17, 2017 00:26 IST

ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, शिा, जैन, शिवधर्मीय आदी समुहातील बहुजन समाजाला ८५ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, ...

८५ टक्के आरक्षणाची मागणी : यापुढे ४३ हजार गावांमध्ये निघणार मोर्चे चंद्रपूर : ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, शिा, जैन, शिवधर्मीय आदी समुहातील बहुजन समाजाला ८५ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवारी चंद्रपूर येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बाबरतुल्लाह दर्गा मैदान येथून दुपारी २ वाजता काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गाने फिरविण्यात आल्यानंतर मोर्चाचा प्रारंभस्थळी समारोप करण्यात आला. तत्पूर्वी, झालेल्या प्रबोधन सभेमध्ये राज्यातील ४३ हजार ७७१ गावांमध्ये बहुजन क्रांती मोर्चा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली.विविध सामाजिक संस्थांतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एकच पर्व, बहुजन सर्व’, अशी घोषणा घेऊन विविध मागण्यांचे फलक आणि विविध रंगाचे ध्वज हातात घेऊन मोर्चा शहरातून फिरविण्यात आला. चांदा क्लब मैदान येथून हा मोर्चा पाण्याची टाकी चौक, जटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौकमार्गे जटपुरा गेट आणि तेथून बाबरतुल्लाह दर्गा मैदानात समारोप करण्यात आला. तेथून भारत मुक्ती मोर्चाचे डी. आर. ओहोळ यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे मोर्चेकऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा प्रारंभ होण्यापूर्वी बाबरतुल्लाह दर्गा मैदानात प्रबोधन सभा घेण्यात आली. या सभेमध्ये डी. आर. ओहोळ म्हणाले, ३६ जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात आल्यावर महामोर्चाचे आयोजन २१ जानेवारीला मुंबई येथे करण्यात येत आहे. त्यानंतर प्रबोधनाचे काम थांबणार नसून राज्यातील ४३ हजार ७७१ गावांमध्ये गावपातळीवर मोर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी अ‍ॅड. फरहान मिर्झा बेग म्हणाले की, मुस्लीम समाज या देशातील मूळनिवासी आहे. अ‍ॅड. रफिक यांनी मुस्लीम आरक्षण संविधानाच्या चौकटीत येत असल्याचे उच्च न्यायालयाने प्रमाणित केल्याचे सांगितले. एमआयएमतर्फे इरफानबाबा शेख यांनी मोर्चाला समर्थन दिले. यशोधरा पोतनवार दिवाकर पेंदाम राजू झोडे, सुधाकर चौके , प्रा. हस्ते, किशोर पोतनवार, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रवीण खोबरागडे, उमेश कडू, राजूरकर, अंकूश वाघमारे, संगिता कांबळे, अली अन्वर, मुश्ताक शेख, भारती रामटेके, सुधाकर चौके आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)मोर्चेकऱ्यांच्या मागण्याशेतमालाचे भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा, ओबीसींची जातीनिहाय गणना तत्काळ करा, अ‍ॅट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, मुस्लिमांना १५ टक्के आरक्षण लागू करा, आदिवासींसाठी राज्यघटनेतील अनुसूची ५ व ६ तत्काळ लागू करा, बारा बलुतेदारांच्या हक्काची अंमलबजावणी करा, महिलांना सर्वच क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृतीत वाढ करण्यात यावी आदीसह विविध मागण्या करण्यात आल्या.विविध वेशभूषेतील बालकांचा सहभागया मोर्चात पारंपारिक आदिवासींची वेशभूषा करून आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहल्याबाई आदी महापुरूषांच्या वेशभूषेमधील बालके सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते.