शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

पोंभुर्ण्यात मोठा दुग्ध विकास प्रकल्प उभारणार

By admin | Updated: October 7, 2014 23:32 IST

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले.

सुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा तालुक्यात विविध गावांमध्ये भेटींच्या माध्यमातून जनसंवादचंद्रपूर : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत मोदींनी भारतवासीयांची मने जिंकली. गेल्या १५ वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राला अधोगतीकडे नेले आहे. केवळ भ्रष्टाराचात आघाडीवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राची अक्षरश: लूट केली आहे. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली. याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. राज्यात भाजपा व मित्रपक्षांचे सरकार सत्तारुढ झाल्यास पोंभूर्णा एमआयडीसीचा निर्णय तातडीने घेण्यात येईल तसेच पोंभूर्णा तालुक्यासाठी दुग्धविकास प्रकल्प उभारण्यात येईल, असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रााचे भाजपा- रिपाई (आ.)- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा तालुक्यातील नवेगार मोरे येथील जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. पोंभूर्णा तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली आहे. तालुक्यात फिरते वाचनालय उपलब्ध केले आहे. उपकोषागार कार्यालयाची निर्मिती केली. ग्रामीण रुग्णालय मंजूर करविले आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ५२ लक्ष रुपये निधी विकासकामांसाठी मंजूर केला आहे. माळी समाजासाठी सभागृह, श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय अशी विविध विकास कामे आम्ही पूर्णत्वास आणली आहे. नेत्र चिकित्सा शिबिर, अपंगांना तीनचाकी सायकलींचे वितरण, सामूहिक विवाह मेळावे अशा विविध सामाजिक उपक्रमांची मालिका आम्ही या तालुक्यात राबविली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून राज्यात भाजपाचे सरकार आल्यास या तालुक्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.यावेळी प्रमोद कडू म्हणाले, राज्यात यंदा सत्ता परिवर्तन अटळ आहे. जनता भाजपाला पूर्ण बहुमत देणार असा विश्वास आहे. यावेळी मंचावर भाजप नेते प्रमोद कडू, भाजपाचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष गजानन गोरगंटीवार, जि.प. सदस्य अल्का आत्राम, पं.स. सभापती बापू चिंचोळकर, पं.स. सदस्य महेश रणदिवे, भारती कन्नाके, बाजार समितीचे सभापती राहुल संतोषवार, उपसभापती हरिश ढवस आदी भााजपा पदाधिकारी उपस्थित होते.