शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा मोठा गुन्हेगार

By admin | Updated: March 6, 2017 00:33 IST

अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. महिला या स्वत:ला दुर्बल समजतात, अन्याय, ....

मान्यवरांचा सूर : कामाच्या ठिकाणी ‘लैंगिक छळ संरक्षण अधिनियमा’वर कार्यशाळाचिमूर : अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. महिला या स्वत:ला दुर्बल समजतात, अन्याय, अत्याचार सहन करतात म्हणून त्यांच्यावर अन्याय होतो. या अन्यायाला वाचा फोडा, बोला, अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार करा, सहन करू नका डॉ.बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले आहे, त्याचा उपयोग करा, असे आवाहन प्रा. पिठाडे यांनी केले.आठवले समाजकार्य महाविद्यालयात २७ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार ‘कामाच्या ठिकाणी लैंगीक छळ संरक्षण अधिनियम २०१३’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. सातारडे होते. त्यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ संरक्षणअधिनियम २०१३ यात समाविष्ठ बाबींवर प्रकाश टाकला तर लैंगीक छळ कशाला म्हणायचे, त्यातील प्रावधान शिक्षा, विशाखा समिती या विषयावर मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर होत्या. त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तक्रारी असल्यास समितीकडे तक्रार बिनधास्त करा, घाबरू नका, अन्याय अत्याचार सहन करू नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आयोजन प्रा.विणा काकडे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार ज्योत्सना शिंगणजुडे यांनी मानले. यावेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)