शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा संदेश देत दिल्लीपर्यंत सायकलस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:41 IST

देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी नागरिक मुख्यत: रेल्वे किंवा विमानाने प्रवास करीत असतात. मात्र भद्रावती तालुक्यातील चोरा येथील ऋषी बांदूरकर या ३५ वर्षीय युवकाने देशाचे पंतप्रधान यांना भेटण्यासाठी तसेच स्वच्छतेचा संदेश, जल, वृक्ष संवर्धन आणि भारत जोडो या अभियानाचा संदेश देण्यासाठी इंधन वाहनाचा उपयोग न करता त्यांनी भद्रावती येथील चोरा ते दिल्लीपर्यंत हा टप्पा चक्क सायकलने गाठला. एक महिना दोन दिवसांचा एकट्याने प्रवास करून भद्रावती शहरात येताच त्यांच्यावर स्वागताचा वर्षाव करण्यात आला.

ठळक मुद्देएक महिना दोन दिवसात पूर्ण केला प्रवास : चोरा येथील ऋषी बांदूरकर यांची कामगिरी

विनायक येसेकर।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी नागरिक मुख्यत: रेल्वे किंवा विमानाने प्रवास करीत असतात. मात्र भद्रावती तालुक्यातील चोरा येथील ऋषी बांदूरकर या ३५ वर्षीय युवकाने देशाचे पंतप्रधान यांना भेटण्यासाठी तसेच स्वच्छतेचा संदेश, जल, वृक्ष संवर्धन आणि भारत जोडो या अभियानाचा संदेश देण्यासाठी इंधन वाहनाचा उपयोग न करता त्यांनी भद्रावती येथील चोरा ते दिल्लीपर्यंत हा टप्पा चक्क सायकलने गाठला. एक महिना दोन दिवसांचा एकट्याने प्रवास करून भद्रावती शहरात येताच त्यांच्यावर स्वागताचा वर्षाव करण्यात आला.ऋषी बांदूरकर याचे दिल्लीला सायकलने जाण्याचे पूर्वीपासूनच स्वप्न होते. त्याने ७ जानेवारीला सायकलवर पर्यावरणाचे फलक व तिरंगा लावून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. चंद्रपूरवरून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याच्या सायकल स्वारीला हिरवी झेंडी दाखविली होती. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, यांची भेट घेतल्यानंतर ऋषी याची दिल्ली स्वारीला सुरूवात झाली. बैतूल मार्गे, भोपाळ, हरियाणा दिल्ली असा प्रवास करून २२ जानेवारीला तो दिल्ली येथे पोहचला. २६ जानेवारीला गणराज्य दिनाच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमालासुध्दा त्याने उपस्थिती दर्शविली. दिल्ली येथे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांची भेट घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची भेट घेता आली नाही. आठ दिवसांच्या दिल्ली प्रवासानंतर तो ३१ जानेवारीला दिल्लीवरून परतीच्या प्रवासाकरिता निघाला.ग्वालियर मार्गे झाशी येथे आला. माजी मंत्री प्रदीप जैन यांनी तिथे त्याचा सत्कार केला. ८ फेब्रुवारीला नागपूर येथे आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनतर ९ जानेवारीला तो भद्रावती येथे पोहचला. चोरा येथे पोहचताच त्याचे स्वागत करण्यात आले. चोरा येथील शिंदे महाविद्यालयाचा तो माजी विद्यार्थी असल्याने माजी आमदार निळकंठराव शिंदे यांनीसुध्दा त्याचा सत्कार केला.यापूर्वीसुध्दा मी एकट्यानेच महाराष्ट्र दर्शन सायकलनेच पूर्ण केले होते. वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, भारत जोडो या अभियानाची देशात पूर्णपणे जागृती व्हावी, यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सायकल स्वारी केली.- ऋषी बांदुरकर