शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

बिबी ग्रामपंचायत बनणार ‘मॉडेल व्हिलेज’

By admin | Updated: April 3, 2017 01:55 IST

बिबी ग्रामपंचायतची विकासाकडे जोरदार वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये विकासाचे काम करण्याचा उत्साह आहे.

धनंजय साळवे : ग्रामपंचायतने राबविले विविध कल्याणकारी उपक्रम कोरपना : बिबी ग्रामपंचायतची विकासाकडे जोरदार वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये विकासाचे काम करण्याचा उत्साह आहे. त्यामुळे बिबी ग्रामपंचायत लवकरच ‘मॉडेल व्हिलेज’ बनणार, असा विश्वास कोरपना पंचायत समितीचे सहायक संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी व्यक्त केला. नुकतीच त्यांनी ग्रामपंचायत बिबी येथे भेट देऊन सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी गावामध्ये सुरु असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. गावाच्या विकासाचा वेग पाहून धनंजय साळवे यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या आठ महिन्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटग्रामपंचायतमध्ये समाविष्ठ गावातील १५ आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत एमएस-सीआयटी प्रशिक्षण, १५ विद्यार्थ्यांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण व परवाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन (बु.), धामणगाव व नैतामगुडा या शाळांना संगणक संच, गावातील मुख्य मार्गावर वृक्षारोपण, मनरेगाच्या माध्यमातून ६० शोषखड्डे, ८० एल.ई.डी. बल्ब, अल्ट्राटेक सिमेंट विलफेअर फाऊंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने गावातील लोकांना शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम तसेच विविध रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, गावातील लोकांना विविध ग्रामसभाविषयक माहिती, शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्पीकरच्या माध्यमातून दिवंडी दिली जाते. गटग्रामपंचायतीमधील बिबी, धामणगाव, आसन (बु.), नैतामगुडा व गेडामगुडा या पाचही जिल्हा परिषद शाळांना एक वर्गखोली डिजिटल करण्यासाठी एल.ई.डी. टी.व्ही. व इतर साहित्य देण्यात आले. अशाप्रकारची अनेक महत्त्वपूर्ण कामे अल्पावधीत झाल्याने गावाचा विकासदर समाधानकारक असल्याचेही सहायक संवर्ग विकास अधिकारी साळवे यांनी म्हटले. बेसलाईन सर्व्हेनुसार गाव हागणदारीमुक्त झाले असून कचराव्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पांदण रस्ते, स्मशानभूमी व कब्रस्थानचा विकास अशा अनेक समस्या सोडविणे ग्रामपंचायत समोरील मोठे आव्हान आहे. ग्रामपंचायतला पेसा निधी, चौदावा वित्त आयोग, सामान्य निधी या निधीच्या माध्यमातून नियमित कामे होत असले तरी े पाठपुरावा करून समस्या पूर्ण करण्यास मदत करू असे आश्वासन धनंजय साळवे यांनी आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी) एका शाळेला आय.एस.ओ. मानांकन गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेली गेडामगुडा येथील जिल्हा परिषद शाळेला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. बिबी येथील जिल्हा परिषद शाळेचे आय.एस.ओ. साठी नामांकन झाले आहे. लवकरच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त करणार असल्याचे मुख्याध्यापिका साधना वाढी यांनी सांगितले. २०११ च्या लोकसंख्येनुसार बिबी ग्रामपंचायतची लोकसंख्या ४ हािर ४४४ असून हल्लीची लोकसंख्या ७ हजारांच्या जवळपास आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेता ग्रामपंचायतला मिळणारा निधी अपुरा पडत आहे. मात्र शासनाकडे पाठपुरावा करून शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून निधी खेचून आणण्यात आम्हाला यश मिळत आहे. बिबी ग्रामपंचायतची आदर्श गावाकडे वाटचाल सुरु आहे. -प्रा. आशिष देरकर, उपसरपंच ग्रा.पं.बिबी स्वस्त दारात शुद्ध व थंड पाणी अल्ट्राटेक सिमेंट विलफेअर फाऊंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने पेसा निधीअंतर्गत गावातील लोकांसाठी शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरु करण्यात आले असून अल्क्प रकमेमध्ये पुरवठा होत आहे. ५ रुपयात लोकांना २० लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.