मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन : गावकऱ्यांना मिळणार पिण्याचे पाणीलोकमत न्यूज नेटवर्कतळोधी(बा) : महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १७१ प्रकल्पांचा (ई) भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीण यांच्या हस्ते तळोधी येथे पार पडला. जिल्हा परिषद चंद्रपूर, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण योजनेंतर्गत तळोधी(बा) येथील पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्याकरिता येथील एका खासगी सभागृहात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे मुख्य अभियंता जगतारे, शाखा अभियंता डंबारे, बीडीओ प्रकाश तोडेवार, पंचायत समिती सभापती रवी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे, कार्यकारी अभियंता एस.सी. झलके, उपविभागीय अभियंता सहारे, सरपंच राजू रामटेके, उपसरपंच भास्कर लोनबले, भाजपा नेते वसंत वारजुकर, भाजप तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.तळोधी(बा) पाणी पुरवठा योजनेकरिता ५८४.६८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून घोडाझरी तलावातून तळोधी(बा) येथील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून तळोधी(बां.) येथील पाणी समस्येची नेहमीकरिता अडचण मिटणार आहे. या योजनेतून शुद्ध ४० लिटर पाणी पुरवठा केला जाईल, असे आमदार बंटी भांगडिया यांनी कार्यक्रमात सांगितले. तत्पुर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-भूमिपूजन पार पडले. या सोहळ्याकरिता तळोधी(बा) व परिसरातील जनता बहुसंख्येने हजर होती. कार्यक्रमाचे संचालन दिनकर पाकमोडे यांनी तर प्रास्ताविक जगतारे यांनी केले. गेल्या कित्येक दिवसांपासून होत असलेली पाणी पुरवठा योजनेची मागणी पुर्णत्वास येण्याची शक्यता वाढल्याने तळोधी येथील नागरिकांत आनंद पसरला आहे.
पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
By admin | Updated: July 11, 2017 00:29 IST