शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचा भीमपराक्रम राज्याला प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडेल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणाऱ्या शेकडो मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, .....

ठळक मुद्देअशोक उईके : अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी केला गुणगौरव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडेल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणाऱ्या शेकडो मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, अशा शब्दात महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी कौतुक केले.यावेळी समितीच्या अन्य आमदार सदस्यांनी या मुलांची मुलाखत घेत एव्हरेस्टच्या आठवणींना जागृती दिली. जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करुन चंद्रपूर जिल्हयात तसेच महाराष्ट्रासह देशात आपले नाव लौकीक केले आहे. अशा या विद्यार्थ्यांचा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा विधानसभा सदस्य डॉ. अशोक उईके व समितीचे सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार राजा वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकुर, आमदार श्रीकांत देशपांडे, उपसचिव राजेश तारवी, अपर सचिव संजय कांबळे व कक्ष अधिकारी दामोदर गायकर यांनी चंद्रपूरमध्ये आगमन झाल्यानंतर पहिली भेट आदिवासी विक्रमविरांची घेतली. समितीच्या सदस्यांनी यावेळी या मुलांना अनेक प्रश्न विचारले. या मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार उच्चपदस्थ नोकºया मिळाव्यात. चांगल्या ठिकाणी त्यांना समाजाचे नेतृत्व करता यावे, याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी समितीचे सदस्य आमदार वैभव पिचड यांनी केले. तर अन्य सदस्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतले. चंद्रपूर ते एव्हरेस्ट हा प्रवास करतांना आलेल्या अडचणी, शासनाकडून झालेली मदत याबद्दलही समिती सदस्यांनी माहिती घेतली. या मुलांनी आदिवासी समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.यावेळी समितीच्या सदस्यांनी कवीदास काठमोडे, मनीषा धुर्वे, परमेश आडे, विकास सोयाम, आकाश मडावी, शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, अक्षय आत्राम या विद्यार्थ्यांचा गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला. यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होते.

टॅग्स :Everestएव्हरेस्टPrabhudas Bhilavekarप्रभुदास भिलावेकर