लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : नगर परिषद झालीच पाहिजे, असे फलक घेऊन घोषणा देत घुग्घुस नगरपरिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी स्थानिक राजीवरतन चौक ते स्नेहप्रभा मंगल कार्यालयापर्यत ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात आले. या वेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्याची उपस्थिती होती. आंदोलन रात्री ७.३० वाजेपर्यत सुरूच होते.१९९९ मध्ये राज्य शासनाने नगर परिषदेची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. शासनाच्या निकषानुसार नगर परिषद करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही काळातच ती अधिसूचना मागे घेण्यात आली. त्यामुळे वीरूगिरी, रस्ता रोको, घुग्घुस बंद, बेमुदत उपोषणा यासारखे आंदोलन करण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधी शासन, प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे गावाचा सर्वागीण विकास होऊ शकला नाही. आता रविवारी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत आंदोलन सुरूच होते. या आंदोलनातून रक्कम गोळा होणारी रक्कम न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष शामराव बोबडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण सादलावार, महासचिव राजीरेडडी प्रोददटुरी यांनी सांगितले.
घुग्घुस नगर परिषदेसाठी ‘भिक मांगो’ आंदोलन
By admin | Updated: May 15, 2017 00:46 IST