ब्रह्मपुरी : वडसा मार्गावरील बारई तलावासमोर मुख्य मार्गावर असलेल्या भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक काही अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु घरमालक गिरीधर पिसे यांच्या प्रयत्नाने तो हाणून पाडला.शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी बारई तलावाच्या मुख्य रोडला लागून असलेली दि भंडारा अर्बन को- आॅप बँक शाखा ब्रह्मपुरी फोडण्याचा प्रयत्न केला. पण पहाटेच्या वेळी नागरिक फिरायला निघतात. अशा फिरण्याच्या सवयीप्रमाणे घरमालक गिरीधर पिसे हेसुद्धा बाहेर पडले असता त्यांना बँकेसमोर दगड मारुन काचेची तावदाने फोडणे सुरु होते. त्याचवेळेस त्यांनी प्रतिकार केला. तेव्हा चोरटे हुलकावणी देऊन पळून गेले. (तालुका प्रतिनिधी)
भंडारा अर्बन बँक फोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: December 5, 2015 00:56 IST