शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भानामती, जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री वडेट्टीवार या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दलाच्या स्थापनेसह डोक्यातील भूत काढण्यासाठी प्रबोधनावर विशेष भर या कृती आराखड्यात देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात गावकऱ्यांनी आठ जणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जादूटोणा, भानामतीच्या संशयावरून चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या अमानुष घटनांमुळे राज्यच नव्हेतर, देश सुन्न झाला. अशा घटना कशा रोखता येतील, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरीभाऊ पाथोडे यांनी हा कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री वडेट्टीवार या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दलाच्या स्थापनेसह डोक्यातील भूत काढण्यासाठी प्रबोधनावर विशेष भर या कृती आराखड्यात देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात गावकऱ्यांनी आठ जणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर नागभीड तालुक्यात दोन, चंद्रपूर आणि अलीकडेच चिमूर तालुक्यात आंगणवाडी केंद्रात पूजेचे लिंबू फेकण्याचा प्रकार घडला. अशा घटनांवर आळा घालण्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी कृती आराखड्यासाठी पुढाकार घेतला. याची जबाबदारी गेल्या ३० वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाने कार्य करीत असलेले हरीभाऊ पाथोडे यांच्यावर सोपविली होती.  चंद्रपूर जिल्ह्यात कृती आराखडा यशस्वी झाल्यानंतर हा पॅटर्न राज्यात राबविण्याचा मानस वडेट्टीवारांचा आहे. या कृती आराखड्यावर पुढील कार्यवाहीची जबाबदारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सामाजिक न्याय विभागाला दिलेली आहे. 

असा आहे कृती आराखडा

जादूटोणा व भानामतीमुळे ग्रस्त गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जादूटोणाविरोधी कृती दल तयार करणे. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, दलित प्रतिनिधी, मागासवर्गीयांचा प्रतिनिधी, महिला मंडळ प्रतिनिधी असा सात ते आठ जणांचा समावेश असेल. या कृती दलाला एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाची रूपरेषाही सादर केली आहे. ३० ते ३५ वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारी मंडळी हे प्रशिक्षण देतील. नंतर असेच कृती दल जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये तयार केले जाईल.गावागावांत सामूहिक प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दल तयार झाले तर या माध्यमातून जादूटोणाविरोधी विधेयक २०१३ हेसुद्धा जनतेला माहिती होईल. ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्यावर प्रबोधन होईल, या अनुषंगाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेवरून कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.- हरीभाऊ पाथोडे, राज्य संघटक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार