शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपूर तालुका निर्मितीसाठी दुसऱ्या दिवशी भजन आंदोलन

By admin | Updated: September 21, 2016 00:44 IST

शंकरपूर तालुका निर्मितीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

कडकडीत बंद : शाळा, महाविद्यालयांनीही घेतला सहभागशंकरपूर : शंकरपूर तालुका निर्मितीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. गावातील व परिसरातील भजन मंडळाने भजने गावून अभिनव आंदोलन केले.तालुका निर्मितीसाठी शंकरपूर तालुका संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय यांनी स्वयंमपूर्तीने शाळा बंद ठेवून तालुका निर्मितीसाठी पाठिंबा दिला. याच बरोबर परिसरातील जनतेनेही पाठिंबा दर्शवून समितीच्या मंडपाला भेट देत आहेत. गावातील गुरुदेव सेवा मंडळ, आदर्श महिला मंडळ, नूतन महिला मंडळ, महिला भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ दहेगाव, हिरापूर येथील भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ कवडशी यांनी भजने गावून आंदोलनात सहभाग दर्शविला. गावात शांततामय वातावरण असले तरीही लोकांच्या मनात तालुका निर्मितीसाठी जिद्द निर्माण झाली आहे.येथील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, नेहरु विद्यालय, गॅलक्सी कॉन्व्हेंट, रुद्रमाला कॉन्व्हेंट, नेहरु, विकास, राजीव गांधी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदी शाळांनी स्वयंपूर्तीने बंद पाळला. भजन आंदोलन उद्याही राहणार असून परिसरातील खेडे गावातही बंद पाळण्यात येणार आहे. मंगळवारी कवडशी (देश), चकजाटेपार आदी गावातील छोट्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. (वार्ताहर)