शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीच्या ‘रितेश’ने घेतली चित्रपटसृष्टीत भरारी

By admin | Updated: March 9, 2015 01:31 IST

जिल्ह्यात कोळशासोबत कलावंतांचीही खाण आहे, असे म्हणतात. याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे.

चित्रीकरण विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित चित्रपटसचिन सरपटवार ल्ल भद्रावतीचंद्रपूर जिल्ह्यात कोळशासोबत कलावंतांचीही खाण आहे, असे म्हणतात. याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित ‘आत्मदाह’ या चित्रपटात नायक असलेल्या ‘कृष्णा’ची भूमिका भद्रावतीच्या रितेश भाऊराव नगराळे रा. पाटीलनगर या युवकाने साकारली आहे. ग्रामीण भागातल्या युवकाने चित्रपटसृष्टीत घेतलेली ही भरारी इतर कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.या चित्रपटाचे कथानकही बोध घेण्यासारखे आहे. मुलाने खुप शिकून मोठा अधिकारी व्हावे, ही शेतकरी असलेल्या वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मुलाला ते पुण्याला पाठवितात. स्पर्धा परीक्षेची तारीख जवळ आली असते. अचानक वडिलांच्या आत्महत्येची बातमी मुलाला कळते. मुलगा खेडेगावात परत येतो. त्यानंतर मात्र पुण्याला न जाण्याचा निर्णय घेतो. आई व बहिणीचा सांभाळ हेच तो आपले कर्तव्य समजतो. शांत न बसता वडिलांच्या आत्महत्येच्या कारणांचा तो शोध घेतो. यामागे कारणीभूत असलेला सावकार त्याला सापडतो. सावकाराने हडपलेली जमीनही त्याला परत मिळते. सावकाराच्याच मुलीवर त्याचे प्रेमही जडते. हे जरी चित्रपटाचे कथानक असले तरी या चित्रपटातील ‘कोमाच्या सिन’ व वडिलांना आत्महत्येचा झालेला पश्चात्ताप हे दृश्य मनाला चटका लावून जात असल्याचे स्वत: या शेतकऱ्याचा मुलगा असलेला कृष्णा म्हणजेच रितेशने सांगितले.रितेशचे शिक्षण दहावीपर्यंत येथील सेक्युलर विद्यालयात झाले. नंतर औरंगाबाद व पुणे येथे त्याने शिक्षण घेतले. पुणे येथे मास्टर आॅफ परफॉर्मिंग आर्टसचा त्याने अभ्यास केला. एकांकिका तसेच व्यावसायिक नाटकही केले. कोरिओग्राफर अर्जुन जाधव यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. याच काळात त्याला ‘आत्मदाह’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अन् ग्रामीण भागातल्या रितेशने या संधीचे सोने केले. यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव (आर्णीजवळ), दाभळी, लोणबेल या ठिकाणी या चित्रपटाचे जास्तीत जास्त चित्रीकरण झाल्याचे रितेशने सांगितले. शेतकऱ्याच्या कुटुंबात शेतकरी यशवंत जामकर, बायको रत्ना कोल्हापूरकर, शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा (रितेश), सुप्रिया पाटील यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश बाठोरे तर निर्माते सुनील जयस्वाल हे आहेत. सावकाराने केलेल्या फसवणुकीमुळे शेतकरी वडील आत्महत्या करतात. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या दृश्यापासूनच चित्रपटाची सुरुवात होते. नवऱ्याच्या आत्महत्येमुळे कृष्णाची आई कोमात जाते व तब्येत बरी झाल्यानंतर ती वडिलांनी आत्महत्या का केली, या प्रकरणाची कृष्णाला माहिती देते.या चित्रपटात ‘क्रोमाचा सिन’ एक वेगळेपणा दर्शवतो. जेव्हा शेतकऱ्याला जाळले जात असते तेव्हा तो शेतकरी जिवंत असल्याचा भास निर्माण करण्यात येतो. त्या ठिकाणी शेतकरी असतो, परंतु तो कोणालाही दिसत नाही. तो इंद्रदेवाचे आभार मानतो. शेवटी आपण आत्महत्या केली, याबाबत शेतकऱ्याला पश्चात्ताप झाल्याचे दाखविले आहे.शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हा संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे रितेशने सांगितले. तसेच शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे तो लोकमतशी बोलताना म्हणाला.