शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती नगरपरिषद राबविणार ‘वेंगुर्ले’ पॅटर्न

By admin | Updated: July 17, 2016 00:35 IST

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाले.

प्रशिक्षण पूर्ण : सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कांडी कोळसाभद्रावती : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाले. या शिबिरात महाराष्ट्रासह गोवा, अंदमान निकोबार येथील नगर परिषदांचे सदस्य, पदाधिकारी, अधिकारी उपस्थि होते. विदर्भातून फक्त भद्रावती नगरपरिषदेचे अध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नगरसेवक प्रा. संजय आसेकर, सभापती प्रमोद गेडाम, नगरसेवक प्रशांत झाडे उपस्थित होते. वेंगुर्ले न.प.च्या वेंगुर्ले पॅनर्टसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. हाच ‘वेंगुर्ले’ पॅटर्न भद्रावती न.प. राबविणार असल्याचे भद्रावतीचे नगरसेवक अनिल धानोरकर यांनी सांगिेतले.प्रशिक्षणात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत निर्मिती करणे, सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जळाऊ कोळसा (कांडी कोळसा) तयार करणे, प्लास्टिक कचरा बारिक करून डांबरी रस्त्याच्या निर्मितीत त्याचा वापर करणे, घनकचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प व घनकचरा व्यवस्थापनाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.त्यानंतर महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त वेंगुर्ले न.प. ला भेट देण्यात आली.याठिकाणी खर्डा, कागद, वाळलेले पानापासून कांडी कोळसा तयार करण्यात येतो. त्यापासून न.प. ला आर्थिक फायदाही होतो. ओल्या कचऱ्यापासून मिथेन गॅस तयार करणे, त्यावर वीज निर्मितीसुद्धा केली जाते. प्लास्टिक बारिक करून डांबरात मिसळून रस्ते तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला आहे. प्रशिक्षणादरम्यान संचालक मोदी सॉलिड वेस्टवर काम करणारे प्लॅनर पार्थिव सोनी व अन्य मार्गदर्शक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)प्लास्टिकमुक्त-हागणदारीमुक्त शहर, स्वच्छ शहर, बायोगॅस प्रकल्प व हरित शहराच्या दिशेने भद्रावती न.प. ने पाऊल उचलले असून यासाठी ‘वेंगुर्ले’ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. यासोबतच १ ते १५ आॅगस्टपर्यंत भद्रावती प्लास्टिकमुक्त शहर करणार आहोत. या पुढचे प्रशिक्षण भद्रावतीत घेण्याचा मानस आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष, भद्रावती.