शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत ‘जी प्लस टू’ अद्ययावत भाजीमंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:16 IST

भद्रावती नगरपालिकेद्वारे वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत अद्ययावत भाजी मार्केट व्यापारी संकुलाचे बांधकाम

भद्रावती पालिकेचा उपक्रम : १२४ गाळे, १० कोटींचे बांधकाम, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : भद्रावती नगरपालिकेद्वारे वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत अद्ययावत भाजी मार्केट व्यापारी संकुलाचे बांधकाम दैनिक गुजरी येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी १४ लाख ४६ हजार रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ‘जी प्लस टू’ इमारत असणार असून यात एकूण १२४ गाळे असणार आहे. भाजीपाल्याच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसुध्दा करण्यात येणार आहे. १५ ते १८ मेपर्यंत दैनिक गुजरीतील जुने व्यापाऱ्यांनी तयार केलेले सर्व शेड्स हटविण्यात आले असून अतिक्रमण हटाव मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. इमारत पूर्ण होईपर्यंत नगरपालिकाद्वारे जवळच या दुकानदारांना जागा देण्यात आली आहे. अतिक्रमण हटविताना प्रामुख्याने नगराध्यक्ष अनिल धानोरकर मुख्याधिकारी विनोद जाधव, न.प. कर्मचारी तसेच ठाणेदार विलास निब्रड उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या इमारतीमुळे न.प.चे उत्पन्न वाढणार असून यात पहिल्या माळ्यावर भाजीमंडी, दुसऱ्या माळ्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स व तिसऱ्यावर अन्य कार्यालये बांधण्यात येणार आहे. यामध्ये भूूमिगत पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार असून स्वच्छतेबाबत विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. एकूण जागा ५३०० चौरसमीटर असून ३१८३-५३ चौ.मीटर जागेवर बांधकाम होणार आहे. यामुळे मार्केट वाढून पर्यायाने शेतकऱ्यांचाही फ ायदा होणार आहे. दररोज सध्याच्या जागेवर भाजीमंडीत १८ ते २० मिनीट्रक व बुधवारला ६० ते ७० मिनीट्रक येत होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. परंतु नविन इमारतीत वाहनांसाठी भूमिगत पार्र्कींग असल्याने गैरसोय टाळता येणार आहे. सर्व गोष्टी या ठिकाणी मिळणार असून मॉलप्रमाणे हे कॉम्प्लेक्स असणार आहे. विखुरलेल्या दुकानदारांना या ठिकाणी गाळे मिळणार असून जुन्या दुकानदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या भाजीमंडीला गुंडावार लॉन समोर जागा देण्यात आली आहे. त्याठिकाणी ले-आऊट टाकून मुरूमाचे रस्ते, पाणी, वीज व्यवस्था न.प.द्वारे करण्यात आली आहे. भद्रावतीच्या विकास कामाचा हा एक महत्वाचा टप्पा असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.