शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... आता डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

मागील काही दिवसांत साथरोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती यामुळे डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मागील दोन महिन्यांत डेंग्यू रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात २४६  सप्टेंबरमध्ये ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात १ हजार ६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत बनले असताना, आता डेंग्यूचाही व्हायरस बदलत असल्याचे दिसून येत आहे. अंगात ताप नसतानाही डेंग्यू पाॅझिटिव्ह आल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेसह सकस आहार, तसेच आरोग्याकडे अधिक लक्ष देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.मागील काही दिवसांत साथरोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती यामुळे डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मागील दोन महिन्यांत डेंग्यू रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात २४६  सप्टेंबरमध्ये ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात १ हजार ६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यात ४५४ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. 

हे बदल काळजी वाढविणारे...

ताप  नसताना पाॅझिटिव्हताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, खाज सुटणे, अशक्तपणा वाटणे ही डेंग्यूची लक्षणे असली तरी, लक्षणे दिसत नसतानासुद्धा डेंग्यूची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे.

प्लेटलेट्स कमी नाहीत तरी पाॅझिटिव्हडेंग्यूची लागण झाल्यानंतर साधारणत: बऱ्याच  रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होतात. मात्र काहींना या आजाराची लागण झाल्यानंतरही त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत नसल्याचे डाॅक्टर आणि पॅथाॅलाॅजिस्ट तज्ज्ञांनी सांगितले. डेंग्यूचा २ टाईप हा प्रकार थोडा धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

१६६७ एकूण नमुने तपासणी  

डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्स कमी होणे गरजेचे नाही. बऱ्याच रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली असते. त्यामुळे अशा रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होत नाहीत. प्लेटलेट्स चांगल्या असणाऱ्यांचाही डेंग्यूचा अहवाल पाॅझिटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी दुर्लक्ष न करता डॅाक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार करणे आवश्यक आहे.- डाॅ. राकेश गावतुरेपॅथाॅलाॅजिस्ट, चंद्रपूर

 

टॅग्स :dengueडेंग्यू