शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST

सावधान.... डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय ताप नसतानाही रुग्ण पाॅझिटिव्ह : योग्य काळजी घेऊन आजारावर करा मात चंद्रपूर : कोरोना संकटामुळे ...

सावधान.... डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय

ताप नसतानाही रुग्ण पाॅझिटिव्ह : योग्य काळजी घेऊन आजारावर करा मात

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत बनले असताना, आता डेंग्यूचाही व्हायरस बदलत असल्याचे दिसून येत आहे. अंगात ताप नसतानाही डेंग्यू पाॅझिटिव्ह आल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेसह सकस आहार, तसेच आरोग्याकडे अधिक लक्ष देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.

मागील काही दिवसांमध्ये साथरोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती यामुळे डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मागील दोन महिन्यांमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. विशेषत: ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यामध्ये २४६ रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्ये ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात १ हजार ६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ४५४ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले.

बाॅक्स

डेंग्यूचे एकूण रुग्ण - ४५४

सप्टेंबरमध्ये आढळलेले रुग्ण - ९४

एकूण नमुने तपासणी - १६६७

बाॅक्स

हे बदल काळजी वाढविणारे...

ताप नसताना पाॅझिटिव्ह

ताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, खाज सुटणे, अशक्तपणा वाटणे ही डेंग्यूची लक्षणे असली तरी, लक्षणे दिसत नसतानासुद्धा डेंग्यूची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे.

बाॅक्स

प्लेटलेट्स कमी नाहीत तरी पाॅझिटिव्ह

डेंग्यूची लागण झाल्यानंतर साधारणत: बऱ्याच रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होतात. मात्र काहींना या आजाराची लागण झाल्यानंतरही त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत नसल्याचे डाॅक्टर आणि पॅथाॅलाॅजिस्ट तज्ज्ञांनी सांगितले. डेंग्यूचा २ टाईप हा प्रकार थोडा धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

कोट

डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्स कमी होणे गरजेचे नाही. बऱ्याच रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली असते. त्यामुळे अशा रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होत नाहीत. प्लेटलेट्स चांगल्या असणाऱ्यांचाही डेंग्यूचा अहवाल पाॅझिटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी दुर्लक्ष न करता औषधोपचार करणे आवश्यक आहे.

- डाॅ. राकेश गावतुरे

पॅथाॅलाॅजिस्ट, चंद्रपूर