शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बकूळ धवनेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:13 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५८ व्या हौशी मराठी अंतिम नाट्य स्पर्धेत नवोदिता चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘नथिंग टू से’ या नाटकातील ‘मालविका’ या भूमिकेसाठी बकूळ धवने हिला सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयाचे रौप्य पदक जाहीर झाले आहे.

ठळक मुद्देमराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५८ व्या हौशी मराठी अंतिम नाट्य स्पर्धेत नवोदिता चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘नथिंग टू से’ या नाटकातील ‘मालविका’ या भूमिकेसाठी बकूळ धवने हिला सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयाचे रौप्य पदक जाहीर झाले आहे.५८ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच मिरज-सांगली या केंद्रावर पार पडली. या स्पर्धेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. नवोदिता चंद्रपूरच्या प्रसाद दाणी लिखीत डॉ. जयश्री कापसे गावंडे दिग्दर्शीत ‘नथिंग टू से’ या नाटकातील भुमिकेसाठी बकूळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य पदकाची मानकरी ठरली आहे. नथिंग टू से हे नाटक नुकतेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे आयोजित कामगार राज्य नाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यातून प्रथम येत सहा पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. या नाटकाच्या दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे गावंडे असून निर्माते अजय धवने व आशिष अंबाडे आहेत. प्रकाशयोजना हेमंत गुहे यांची असुन नेपथ्य पंकज नवघरे व तेजराज चिकटवार यांचे आहे. संगीत अंकुश राजुरकर यांचे असून रंगभुषा व वेशभुषेची जवाबदारी नूतन धवने यांनी सांभाळली आहे. या नाटकात जयंत वंजारी, राजेंद्र तुपे आणि बकूळ धवने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.