शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:27 IST

घरकूल न बांधताच घरकूल बांधून पूर्ण झाल्याची नोंद जिवती पंचायत समितीमध्ये असल्याने जनकापूरच्या अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला.

ठळक मुद्देघरकूल गायब प्रकरण : अधिकाºयांनी घेतली लाभार्थ्यांची भेट

फारुख शेख।आॅनलाईन लोकमतपाटण : घरकूल न बांधताच घरकूल बांधून पूर्ण झाल्याची नोंद जिवती पंचायत समितीमध्ये असल्याने जनकापूरच्या अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आणि लाभार्थ्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेतली. घरकूलापासून वंचित राहणाºया सर्व लाभार्थ्यांना आता नव्याने घरकूल बांधून देण्यात येणार आहे.जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथील गुंडेराव भीमू आत्राम, विठ्ठल लटारी नैताम यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत एक लाख रुपये किंमतीचे घरकूल सन २०१३-१४ या वर्षांत मंजुर झाले. तत्कालीन ग्रामसेवकांनी सदर लाभार्थ्यांना घरकूलाचे बांधकाम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले कच्चे घरे पाडून घरकूल योजनेचे घर बांधण्यास सुरूवात केली व बँकेचे खातेही काढले.एका महिन्यानंतर जिवती पंचायत समितीमध्ये पहिल्या बिलासाठी लाभार्थी गेले असता, त्यांना धक्काच बसला. शासन दरबारी आपले घरकूल बांधकाम पूर्ण झाले, अशी नोंद असल्याचे त्यांना आढळून आले होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘शौचालयापाठोपाठ आता घरकूलही गायब’ असे वृत्त प्रसिद्ध केले असता, जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले.तालुका संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्शी यांनी लाभार्थ्यांची भेट घेऊन तुम्हाला लवकरच घरकूलाची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले.जनकापूर येथील त्या लाभार्थ्यांची भेट घेतली असून लिपिकाच्या चुकीमुळे त्यांचे घरकूल बांधून पूर्ण झाले, अशी नोंद करण्यात आली होती. त्या लाभार्थ्यांना ९५ हजार रुपयाचे घरकूल लवकरच बांधून दिले जाईल.- प्रणव बक्शी,सहायक प्रकल्प अधिकारीगेल्या तीन ते चार वर्षांपासून आपण पाठपुरावा करीत होतो. परंतु अधिकारी व कर्मचारी कोणताच प्रतिसाद देत नव्हते. ‘लोकमत’ने आमची आपबिती प्रकाशित केल्याने अवघे जिल्हा प्रशासन आमच्या दारी आले. लोकमत वृत्तपत्राचे मनपूर्वक आभार.- विठ्ठल नैताम, लाभार्थी.