शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल बिलासाठी लाभार्थ्यांची पायपीट

By admin | Updated: May 24, 2016 01:21 IST

गरीब व गरजु कुटुंबांना राहण्यासाठी हक्काचे घर असावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजना सुरू केल्या.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे : लेखापाल देतो लाभार्थ्यांना ‘तारीख पे तारीख’संघरक्षित तावाडे  जिवतीगरीब व गरजु कुटुंबांना राहण्यासाठी हक्काचे घर असावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजना सुरू केल्या. त्यानुसार अशा लोकांना घर तर मंजूर करण्यात आले पण त्या लोकांना बिलासाठी पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयातील लेखापाल हे या लाभार्थ्यांना ‘तारीख पे तारीख’ देवून बोलावत असल्याचे लाभार्थ्यांनी लोकमतजवळ बोलताना सांगितले.जिवती तसा मागासवर्गीय लोकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यांना राहण्यासाठी घर असावे, यासाठी घरकूल मंजूर करण्यात आले. पण अजूनही दोन ते तीन वर्ष लोटले असले तरी त्या लाभार्थ्यांना बिलाची रक्कम मिळालेली नाही. कोणाला एक बिल मिळाले तर कोणाला आतापर्यंत एकही बिल मिळालेले नाही.लोकमत प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता तिथे जमा असलेल्या लाभार्थ्यांनी आपली आपबिती सांगितली. गेल्या आठवड्यात आम्ही बिलासाठी आलो. परंतु येथील लेखापाल एस.आर. निंबेकर यांनी सोमवारला या असे सांगून आम्हाला परत पाठविले. आज आम्ही त्यांनी बोलावल्याप्रमाणे कार्यालयात आलो. परंतु ते स्वत: कार्यालयात हजर नाही. त्यामुळे आम्ही येण्याजाण्याचा पैसा खर्च करून कितीदा यावे, हा प्रश्न आमच्यासमोर पडल्याचे त्यांनी सांगितले.रावसाहेब घाडगे, पुनागुडा, चिनू जैतु, मेश्राम, पुनागुडा विठ्ठल नैताम जनकापूर, गुंडेराव आत्राम जनकापूर, मारू सिडाम, पाटागुडा, रामु सिडाम पाटागुडा हे सर्व घरकूल लाभार्थी उन्हातान्हात बिलासाठी कार्यालयात आले होते. यापैकी बरेचसे लाभार्थी हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. लेखापाल एस.आर. निंबेकर हे भेटले तरी बिल देत नाही.कधी नंतर या असे सांगून वेळ मारून नेतात तर कधी बोलावूनसुद्धा हजर राहत नाही, असेही सांगितले. एका लाभार्थ्याने येत्या १५ दिवसात माझ्या मुलीचे लग्न आहे. माझ्याजवळ असलेले पैसे मी घरकुल बांधकामात गुंतविले आणि आता जर बिल मिळाले नाही तर खुप मोठी अडचण निर्माण होईल असे बोलून नाराजी व्यक्त केली.