शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत अडकले शासकीय योजनांचे लाभार्थी; नवीन सरकार स्थापन होईपर्यंत प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 14:12 IST

लाभार्थी हिरमुसले : लाडक्या बहिणींचेही पोर्टल झाले बंद

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज दाखल केले होते. बहुचर्चित लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा पात्र अर्जदारांना लाभही मिळाला. मात्र, मंगळवारी (दि. १५) निवडणूक आचारसंहिता लागल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही थांबवली. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने आंदोलन व मोर्चावर निर्बंध आले. सार्वजनिक ठिकाणे, धरणे, आंदोलने, निदर्शने व उपोषण करण्यास प्रतिबंध घालण्यात आले. 

कामगारांची नोंदणी बंद समाजकल्याणच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू होती. १४ ऑक्टोबरपर्यंत सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्हाभरातील कामगारांची प्रचंड गर्दी दिसून आली. मात्र, हजारो कामगारांची नोंद होऊ शकली नाही. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही नोंदणी थांबविण्यात आली. कामगारांना देण्यात येणारी संसारोपयोगी भांडी व बोनसही थांबला.

लाडक्या बहिणींचे अर्ज स्वीकारणे थांबविले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज स्वीकारणे आता बंद करण्यात आले आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या लाभार्थीना नोव्हेंबरअखेरचे मानधन देण्यात आले आहे. अर्ज करण्याचे पोर्टल बंद झाले. जिल्हातील हजारो पात्र लाभार्थी बहिणींना अर्ज करण्यासाठी राज्यातील नवीन सरकारची वाट पाहावी लागणार आहे.

दिवाळी बोनसचे काय? बांधकाम कामगार योजनेसाठी नव्याने अर्ज करण्याचे मार्ग बंद झाले. त्यांना देण्यात येणारी भांडी व दिवाळी बोनस वितरणही थांबवण्यात आला. वयोश्री व तीर्थदर्शन योजनेलाही ब्रेक लागला. व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना तात्पूरत्या बंद झाल्या. काही योजनांचा लाभ सुरू ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgovernment schemeसरकारी योजना