शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

२९९ शेळ्यांच्या मृत्यूनंतरही लाभार्थी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:55 IST

मूल, गोंडपिपरी, नागभीड, जिवती व पोंभुर्णा पाच तालुक्यांसाठी शेळीपालन योजना राबविण्यात आली होती. योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडे जबाबदारी होती. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) माध्यमातून पाच तालुक्यातून ४६८ लाभार्थी निवड झाली. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याला २५ टक्के तर अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा स्वत: भरल्यानंतर योजनेचा लाभ देण्यात आला.

ठळक मुद्देशेळीपालन योजनेचे वास्तव : लाभार्थी हिस्सा भरणाऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच तालुक्यात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत देण्यात आलेल्या शेळ्यांमधून २९९ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. मात्र, शासन व लाभार्थ्यांनी विमा हिस्सा भरूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे.मूल, गोंडपिपरी, नागभीड, जिवती व पोंभुर्णा पाच तालुक्यांसाठी शेळीपालन योजना राबविण्यात आली होती. योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडे जबाबदारी होती. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) माध्यमातून पाच तालुक्यातून ४६८ लाभार्थी निवड झाली. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याला २५ टक्के तर अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा स्वत: भरल्यानंतर योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेत ४६८ प्रस्तावित लाभार्थ्यांपैकी प्रत्यक्षात ४३४ लाभार्थ्यांचीच निवड झाली. त्यापैकी ४३१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी २९ ऑगस्ट २०१९ पूर्वी निधी वितरीत केला. शेळीगट खरेदीसाठी तालुका समिती गठित झाली होती. मात्र, लाभार्थ्यांची पसंती अग्रक्रमावर असताना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी शासकीय प्रक्षेत्रनिहाय पुरवठादारांकडूनच खरेदीचे बंधन घातल्याचा आरोप होत आहे. शेळीगट खरेदी करताना लाभार्थी व खरेदी समितीचे सदस्य उपस्थित नव्हते. एका शेळीगटासाठी ८५ हजार याप्रमाणे रक्कम निश्चित झाली. या रकमेतून शेळीगटांचा विमा काढला होता.

विमा कागदोपत्री रंगविल्याची शंकानागभीड : तालुक्यात शेळ्या व बोकड मृत पावल्याने जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या मासिक सभेत चौकशीचा ठराव झाला होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी व उपचार करून नोंदी ठेवाव्या, लसीकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विमा केवळ कागदोपत्री रंगविल्याची शंका लाभार्थ्यांनी उपस्थित केली आहे.

आज जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर होणारजिल्हा परिषदेची शुक्रवारी (दि.२६) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेत अर्थसंकल्प सादर होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने नवीन योजना कोणत्या व निधीची तरतूद कशी करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कोरोनामुळे गतवर्षीच्या अर्थसंकल्पाला मोठी कात्री लागली होती.