शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

न.प.अरसोडावासीयांसाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:38 IST

राज्य शासनाने नुकतीच आरमोरी नगर परिषदेची अधीसूचना जाहीर केली असून या अधीसूचनेत आरमोरी नगर परिषदेत अरसोडा, पालोरा हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआमदारांनी व्यक्त केला विश्वास : गावकºयांना मिळणार विविध योजनांचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : राज्य शासनाने नुकतीच आरमोरी नगर परिषदेची अधीसूचना जाहीर केली असून या अधीसूचनेत आरमोरी नगर परिषदेत अरसोडा, पालोरा हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र अरसोडावासीयांनी आरमोरी नगर परिषदेमध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेमध्ये शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येतो. पालिकेतर्फे विविध योजना राबविण्यात येणार असून अरसोडावासीयांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. एकूणच गावाच्या विकासासाठी नगर परिषद फायदेशिर राहील, असा विश्वास आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त केला आहे.अरसोडा ग्रामवासी चुकीच्या संभ्रमात असल्याने नगर परिषद झाल्यावर त्यांना ग्रामीण, पंचायत समितीस्तरावरील योजनांचा लाभ मिळणार नाही, असे त्यांचे मत आहे. मात्र पं. स., जि.प. व ग्रा. पं. स्तरावर असलेले रस्ते, नाली बांधकाम, जलयुक्त शिवार योजना, रोजगार हमी योजना, घरकूल तसेच शेतीपयोगी अवजारे व साहित्य नगर परिषदेमार्फत अरसोडावासीयांना मिळणार आहे. सदर योजना पालिका झाल्यानंतर बंद होणार नाही, असे आ. गजबे यांनी म्हटले आहे. शेतकरी व सर्वसामान्य विकासाच्या योजना नगर परिषद क्षेत्रात कार्यान्वित राहतील, असे फेरबदल राज्य शासनाने केले आहे. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी पालिकेमार्फत नव्या योजना तयार करता येऊ शकते व त्यासाठीचा निधी राज्य शासन देण्यास तत्पर आहे, असेही आ. गजबे यांनी म्हटले आहे.आरमोरी नगर परिषद क्षेत्राच्या विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत, असेही आ. कृष्णा गजबे यांनी म्हटले आहे.आराखडा तयार व्हावाआरमोरी शहराच्या विकासासाठी यापूर्वीच आपण राज्य शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. निवडणुकीनंतर विराजमान होणारे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मिळून अरसोडा, पालोरा, शेगाव व आरमोरी शहर विकासाचा संयुक्त विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. यात शेती, रस्ते, आरोग्य, पाणी सुविधेचा समावेश असावा.