शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

बैलजोडी गेली; मशागत कशी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:34 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही.

ठळक मुद्देकाळाचा घाला : नापिकीमुळे नागवलेल्या शेतकऱ्याची अगतिकता

शशिकांत गणवीर।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल असून आर्थिक विवंचनात सापडल्याचे चित्र आहे. अशातच ७० हजार खर्चुन नवी बैलजोडी घेतली. मात्र वीज पडून डोळ्यादेखत दोन्ही बैलांचा तडफडून मृत्यू झाला. आता खरीप हंगामात मशागत कशी करायची, असा प्रश्न आपादग्रस्त शेतकºयापुढे उभे ठाकला आहे.मागील काही दिवसात उन्हाळ्याच्या तीव्र दाहकतेने मानवासह सर्वाचीच लाहीलाही होत असतानाच वादळी वाºयाने जिल्ह्याला झोडपले. या वादळात अनेकांची घरे उद्ध्ववस्त होऊन निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळ व मेघगर्जनेत मूल तालुक्यातील सिंतळा येथील नागेंद्र घोनडे यांच्या अंगणात बांधून असलेल्या लाल्या-पांढऱ्या नामक बैलजोडीवर वीज कोसळली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. या अचानक आलेल्या संकटाने शेतकरी हादरला. डोळ्यादेखत नवीन घेतलेली बैलजोडी क्षणार्धात मृत पावल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले अन् शेतकरी ढसाढसा रडला.मागील वर्षी पडलेल्या अत्यल्प पाऊस व धानपिकावर आलेल्या रोगाने धानपिक उद्ध्वस्त झाले. उत्पन्न निम्यावर आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. अशातच येणाऱ्या हंगामाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. शासनाची कर्जमाफीचीही तारीख पे तारीख होत असल्याने नव्याने कर्ज मिळेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.नवीन हंगामाच्या मशागतीकरिता सिंतळा येथील शेतकरी नागेंद्र घोनडे यांनी ७० हजार रुपयांची बैलजोडी खरेदी केली होती. अन् या जोडीवर काळाने घाला घातल्याने शेतकरी हादरला आहे. या घटनेचा पंचनामा, शवविच्छेदन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत केव्हा मिळेल, याची शाश्वती नसल्याने येणाऱ्या हंगामाची मशागत कशाने करायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सदर शेतकऱ्याला तत्काळ निधी मंजूर करून मिळणारी नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.