शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतातील पिकांची निगा राखते ‘ती’ घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:28 IST

सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते.

ठळक मुद्देशेतरक्षक असे नामकरण केले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीची मशागत...त्यानंतर पेरणी...धरित्रीच्या उदरातून अकुंरलेल्या बीजांपासून ते उत्पन्न घरी येईपर्यंत पिकाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. ही खटाटोप करूनही उत्पन्न हाती नाही लागले, तर शेतकरी हवालदिल होतो आणि मग तो नैराशात वावरतो. परंतु चंद्रपुरातील एका तरुण शेतकऱ्याने नैराशाच्या गर्तेत न राहता वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अफलातून शक्कल शोधून काढली. आता त्याच्या पिकांचे रक्षण त्याने शेतीत लावलेली स्वयंचलित घंटा करीत आहे. या यंत्राचे त्यांनी शेतरक्षक असे नामकरणही केलेले आहे. हे यंत्र पूर्णत: वॉटर प्रूफ असल्यामुळे विद्युत शॉकचा धोका नाही, हे विशेष.सुहास पिंगे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव. त्यांचे वास्तव्य चंद्रपुरातील गोकुळ गली येथे आहे. त्यांची शेती वरोरा तालुक्यातील गौळ येथे आहे. त्याच्या शेतीचा ४० टक्के भाग हा जंगलाला लागून आहे. रानडुक्कर, चितळ, नीलगाय व ससे या वन्यजीवांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीची नासाडी होत होती. अनेक उपाय करूनही यात त्यांना यश आले नाही. रात्री माणसे जागलीला जात होती. तरीही वन्यजीव जुमानत नव्हते. यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी सोलर पॉवर कुंपण मशीनही लावून बघितली. तरीही काहीएक उपयोग झाला नाही. पिंगे यांनी आयटीआयमध्ये इलेट्रॉनिक्स ट्रेडचे शिक्षण घेतलेले आहे. हा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी पीक संरक्षणासाठी अनोखा प्रयोग करून बघितला आणि यात त्यांना यश आले.सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. त्यासाठी त्यांना केवळ साडेपाच हजार रुपयांचा खर्च आला. १२ वॅटची बॅटरी, आॅटोस्टार्ट, स्पीकर, सर्च लाईट व ताट असे साहित्य वापरात आणले आहेत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते. हे चक्र तिला विद्युत करंट मिळेपर्यंत कायम राहते. सकाळी शेतात गेल्यानंतर ती घंटा परत बंद करून ठेवतात. ही स्वयंचलित घंटा लावल्यापासून वन्यजीवांचा त्रास कायमचा बंद झाला असल्याचे शेतकरी सुहास पिंगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agricultureशेती