शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा असावी पण डोळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:22 IST

जगातल्या सर्वच धर्मानी श्रद्धा मानली आहे. पण, गुरुबद्दल शंका घ्यायची नाही. चिकित्सा करायची नाही.

ठळक मुद्देश्याम मानव : जादुटोणा कायदा विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जगातल्या सर्वच धर्मानी श्रद्धा मानली आहे. पण, गुरुबद्दल शंका घ्यायची नाही. चिकित्सा करायची नाही. ही मानसिकता कायम राहिल्यास श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होते. त्यामुळे माणसांनी श्रद्धा ठेवलीच पाहिजे. मात्र, ती डोळस असावी, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले. स्थानिक पंचशील वसतिगृहाच्या प्रांगणात आयोजित वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर ते बोलत होते.व्याख्यानाचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता बनपूरकर यांनी केले. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, राष्टÑीय अभियान प्रमुख सुरेश झुरमुरे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, अ. भा. अंनिसचे तालुका अध्यक्ष डॉ. खिजेंद्र गेडाम, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, हरिभाऊ पाथोडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. मानव यांनी म्हणाले, श्रद्धा ठेवल्यानंतर शंका घेतली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. पुरावा आढळल्यास तपासणीही केली पाहिजे. नवा पुरावा आला तर विचार बदलला पाहिजे. तरच श्रद्धचे रुपांतर अंधश्रद्धेमध्ये होणार नाही. शोषणाला आळा बसेल. अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी जगातील पहिला कायदा महाराष्टÑात अंमलात आला. जाऊटोणा विरोधी कायदा मजबूत करावयाचा आहे. त्यासाठी हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने अनेक बाबांचा कसा भंडाफोड करण्यात आला, यावरही प्रा. मानव यांनी प्रकाश टाकला. महाराष्टÑात संत परंपराची महती सांगून प्रा. मानव म्हणाले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कर्मयोगी गाडगेबाबा, राष्टÑसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांनी अर्थाने समाजजागृती केली आहे. मंत्रशक्तीच्या नावाखाली रासायनिक पदार्थांचा सर्रास वापर केला जाता,े हे समजून देण्यासाठी काही प्रात्यक्षिकेही सादर केली. मांत्रिकांवर हल्लाबोल चढविण्यात आला. जादूटोणा विरोधी कायद्याची महत्त्वपूर्ण १२ कलमे सांगून महिला व सर्व घटकांना सावध राहण्याचे आवाहन प्रा. मानव यांनी केले आहे. याप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार, नगराध्यक्षा योगीता बनपूरकर, सुरेश झुरमुरे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी विचार मांडले. आ. वडेट्टीवार यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गरज अधोरेखित केली. युवापिढीने या चळवळीला सक्षम करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक व परिचय डॉ. खिजेंद्र गेडाम, संचालन प्रा. बालाजी दमकोंडावार यांनी केले. आभार शशिकांत बांबोळे यांनी मानले. व्याख्यानाप्रसंगी बहुसंख्य महिला युवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्राध्यापक आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.