शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राखीच्या पर्वावर मुनगंटीवारांनी भगिनींना दिली अनोखी ‘सुरक्षा’ भेट

By admin | Updated: August 31, 2015 00:48 IST

मंत्रिपदाचा मुकूट डोईवर घेऊन पायाला चाकं लावल्यागत मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

केंद्राच्या योजनेचा लाभ : स्नेहभावातून महिलांनी बांधली राखीचंद्रपूर : मंत्रिपदाचा मुकूट डोईवर घेऊन पायाला चाकं लावल्यागत मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी रक्षा बंधनाच्या पर्वावर त्यांच्या मतदार संघातील महिला भगिनींना अनोखी भेट दिली. ही भेट स्वीकारताना उपस्थित महिलांनी त्यांच्या हाताला राखी बांधली. यातून लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यातील नात्याला गहिरेपणाचा साज चढला.देशात सत्ताबदल झाल्यानंतर सामान्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना जाहीर केल्या. त्यांपैकी गोरगरीब जनतेला सुरक्षेची हमी देणारी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जाहीर केली. केवळ १२ रुपये भरायचे आणि दुदैवाने एखाद्या विमाधारकाचे अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळेल, असे या योजनेचे स्वरूप आहे. रक्षा बंधनाच्या पर्वावर आपल्या मतदार संघातील भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अभियान राबविले. २१ ते २९ आॅगस्ट या कालावधीत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा या तालुक्यातील महिलांपर्यंत पोहचून या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून विमा योजनेचे अर्ज भरून घेतले. विशेष म्हणजे, या योजनेसाठी द्यावयाची १२ रुपयांची रक्कम भाजपातर्फे भरण्यात आली आणि रक्षाबंधनाच्या पर्वावर हे अर्ज बँक अधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आले. मतदार संघातील चारही तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आयोजित या कार्यक्रमांना स्वत: ना.सुधीर मुनगंटीवार यांनी भेटी दिल्या. महिलांशी संवाद साधला. यावेळी अनेक महिलांनी पुढे येऊन मुनगंटीवारांना ओवाळले. प्रेमपूर्वक त्यांच्या हाताला राखी बांधली. मुनगंटीवारांकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे महिलाही भारावून गेल्यात. अनेक ठिकाणी महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे, बल्लारपूर मतदार संघाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेला कुठेही उल्लेखनिय प्रतिसाद लाभला नाही. सुधीर मुनगंटीवारांच्या कल्पकतेचे, नियोजनबद्धतेचे हे यश आहे. मंत्रिपदाच्या व्यस्ततेतूनसुद्धा वेळ काढून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे आपल्या मतदार संघात व्हावी व ती करताना त्याला संस्कृतीचे आणि भावनिकतेचे अधिष्ठान लाभावे, यासाठी ना.मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रीया येथे व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)