मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीवर आहे. त्यामुळे खासगी व शासकीय रुग्णालये हाऊसफुल होत आहेत. सरकारी रुग्णालयात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व अपुरे मनुष्यबळ यामुळे बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारास पसंती दर्शवितात. याच परिस्थितीचा लाभ घेत खासगी डॉक्टर रुग्णांकडून रग्गड बिल काढत असल्याची ओरड होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
राखीव खाटा नावालाच
चंद्रपूर शहरात सहा खासगी रुग्णालयात कोविड केंद्र आहे. यामध्ये एकूण २२० खाटा कोविड रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९७ रुग्ण भरती असून त्याच्यावर उपचार सुरू आहे; परंतु ज्यादा दर आकारण्यात येत असल्याने जनसामान्यांची अडचण होत आहे.
बॉक्स
अशी आहे बेड्सची आकडेवारी
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण २४० बेड्स आहेत. त्यापैकी ५० आसीयू व ११० बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. तर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये आस्था रुग्णालयात ११ ऑक्सिजन व नऊ आयसीयू, पंत रुग्णालय १५ ऑक्सिजन, तीन आयसीयू, बुक्कावार हॉस्पिटल ५५ ऑक्सिजन, पाच आयसीयू, श्वेता हॉस्पिटल १० ऑक्सिजन, आठ आयसीयू, क्राइस्ट हॉस्पिटल ४८ ऑक्सिजन, १२ आयसीयू, गुलवाडे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे ८० बेड आहेत.